जळगाव

‘कोरोना’पासून कोसो दूर असेही एक गाव ! 

राजू कवडीवाले

यावल : जगासह देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मार्चपासून देशभरात लॉकडाउन प्रक्रिया सुरू होती व मागील महिन्यापासून अनलॉक प्रक्रियेस सुरवात झाली. संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट असताना यावल व चोपडा तालुक्याच्या सरहद्दीवर यावल तालुक्यातील उंटावद येथे मात्र कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही हे विशेष.

लॉकडाउनच्या सुरवातीला उंटावद ग्रामपंचायतीतर्फे सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह ग्रामसेवक गुरुदास जगन्नाथ चौधरी यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले, तसेच गावात वेळोवेळी धुरळणी व फवारणीदेखील करण्यात आली होती. किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांनी कोरोनाकाळात कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या व लॉकडाउनमुळे गावात परतलेल्या ३५ ते ४० रुग्णांची तपासणी करून ग्रामस्थांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.

बाहेरगावी जाणे टाळले

वेळोवेळी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली होती. तसेच कोरोनाच्या काळात ग्रामस्थांनी बाहेरगावी लग्नसमारंभ व अंत्यविधीच्या कार्यक्रमास जाणेही टाळले होते. गावात अंत्यसंस्काराच्या वेळी आपसात सुरक्षित अंतर ठेवत मास्क व सॅनिटायझरचा वापर करत उंटावद ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन केले होते. या सर्व बाबींमुळेच गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. परिसरातील गावांत कोरोनाचे रुग्ण आढळले, मात्र उंटावद येथे सुरवातीपासून ते आजपर्यंत एकही रुग्ण आढळला नाही. 

नियमांचे काटेकोर पालन 
उंटावद हे लहानसे गाव असून, यावल तालुक्यातील शेवटचे व बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गापासून तीन किलोमीटर लांब एका कोपऱ्यात वसलेले आहे. त्यामुळे येथे नातेवाइकांव्यतिरिक्त बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. तसेच गावातील नागरिक किराणा, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेरगावी जात होते. मात्र आपसात सुरक्षित अंतर ठेवत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत असल्यामुळे गावात कोरोनाची लागण झाली नाही. मनात कोरोनाची भीती होती. मात्र शासनाच्या नियमांचे पालन करत उंटावद ग्रामस्थांनी सतर्कता बाळगली म्हणूनच गावात कोरोनाची एन्ट्री झाली नाही. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT