police arrest 
जळगाव

मित्रांच्या आग्रहाखातर तलवारीने कापला केक; आणि दोघी गेले तुरुंगात

Jalgaon Crime News :वाढदिवस साजरा करतांना आपण तलवारीने केक कापला पाहिजे म्हणून त्यांच्या मित्रमंडळींनी त्याच्याकडे आग्रह केला.

राजू कवडीवाले

तलवारीने केक कापतानांचा व्हिडिओ व त्यांच्यासोबत असलेल्या समाधान धनराज तायडे ( रा. कोळन्हावी) यांचा फोटो सर्वत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाला.



यावल: वाढदिवसाचा केक (Birthday cake) कापण्यासाठी तलवारीचा वापर करून स्टंटबाजी करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात (Yaval Police Action) हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळन्हावी (ता. यावल) येथील तरुणाने वाढदिवसाचा केक तलवारीने कापला. आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला. संबंधित तरुणाविरुद्ध यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून सदर तलवार आणि त्या दोघा तरुणांना पोलिसांनी बुधवारी (ता.४) ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील कोळन्हावी येथील निलेश रमेश साळुंखे (वय२३) याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करतांना आपण तलवारीने केक कापला पाहिजे म्हणून त्यांच्या मित्रमंडळींनी त्याच्याकडे आग्रह केला. आणि त्याने देखील त्यांच्या आग्रहखातर केक आणला. आणि तलवारीने केक कापला. तलवारीने केक कापतानांचा व्हिडिओ व त्यांच्यासोबत असलेल्या समाधान धनराज तायडे ( रा. कोळन्हावी) यांचा फोटो सर्वत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

पोलिसांनी पाहिला व्हिडीओ..

हा फोटो आणि व्हिडिओ थेट पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्याकडे गेला तेव्हा या प्रकरणाची पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत मंगळवारी रात्री या दोघा तरुणांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहायक फौजदार अजिज शेख, संजय तायडे, सुनील तायडे आदींना केल्या, तेव्हा या दोघा तरुणांचा शोध लागला. व बुधवारी पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. यातील निलेश रमेश साळुंखे ( वय २३) याचा वाढदिवस होता. तर त्या फोटोमध्ये दिसत असलेला समाधान धनगर तायडे (वय २४) हा देखील दिसला म्हणून दोघांना ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध सहायक फौजदार अजिज शेख यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, हवालदार संजय तायडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT