Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Jalgaon Market Committee Election : 11 जागांवर शिंदे गट, 7 जागांवर ‘भाजप’ लढणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Market Committee Election : कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय घडामोडींना वेग येत आहे. ( Market Committee Election Shinde group will contest on 11 seats BJP on 7 seats Jalgaon news)

माघारीस दोन दिवस शिल्लक असताना आपल्या प्रतिस्पर्धाने माघार घ्यावी, यासाठी उमेदवार प्रतिस्पर्ध्याला गळ घालताना दिसत आहेत. दरम्यान, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप-शिवसेना शिंदे गटाने जागा वाटपाचा तिढा सोडविला आहे. शिंदे गट अकरा, तर भाजप सात जागा लढविणार असल्याची माहिती या गटाच्या प्रमुखांनी दिली.

भाजप-शिवसेना युती व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असलेल्या जळगाव बाजार समितीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. युतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाजार समितीच्या एकूण १८ जागांपैकी ११ जागांवर शिवसेना शिंदे गट, तर ७ जागांवर भाजप निवडणूक लढणार आहे. यात सोसायटी व ग्रामपंचायत गटातून सहा जागा, तसेच व्यापारी गटातून एक जागा भाजपला सोडली आहे. मात्र, अद्याप युतीकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

गावागावांत प्रचार

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी युती व महाविकास आघाडीकडून पॅनल होण्यापूर्वीच गावागावांत प्रचार सुरू झाला आहे. प्रत्येक गटाचे उमेदवार ग्रामपंचायत व सोसायटीच्या सदस्यांची भेट घेऊन चर्चा करीत आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे. युतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीने मोट बांधली असून, त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत, तसेच भेटीगाठी वाढल्या आहेत.

माजी सभापतींची माघारीची भूमिका

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्बल २१३ उमेदवार रिंगणात होते. सहा उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. आता माघारीसाठी दोन दिवस बुधवार (ता. १९) व गुरुवार (ता. २०) आहे. शिंदे गटातून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने माघार घेण्याची भूमिका घेतली असल्याचे माजी सभापती कैलास चौधरी यांनी सांगितले.

भाजपने खेचली सातवी जागा

या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाची एका जागेवरून रस्सीखेच सुरूच होती. यात भाजपने बाजी मारली असून, सातव्या जागेवरही भाजपचा उमेदवार असणार आहे. यात भाजपच्या उमेदवारांबाबतही अंतिम कार्यवाही झाल्याची माहिती आहे. युतीच्या उमेदवारांनी प्रचारही सुरू केला आहे. दोन्ही पॅनलचे लवकरच शेतकरी किंवा मतदारांचे मेळावे होणार आहेत.

त्याची तयारी सुरू आहे. उमेदवारांबाबत खल सुरू आहे. काही नावे पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजपतर्फे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन निश्चित करतील. सर्वच उमेदवारांची नावे जाहीर करणे दोन्ही पॅनल किंवा युती व महाविकास आघाडीने टाळले आहे. यामुळे पक्षात बंडखोरी किंवा धुसफूस होऊ शकते. त्यामुळे काही नावे माघारीनंतरच जाहीर होतील, अशी माहिती मिळाली.

कोळी, गुर्जर समाजावर अन्याय करू नका

महाविकास आघाडी आणि युतीच्या पॅनलमध्ये जातीय समीकरणांवर काम सुरू आहे. जळगाव ग्रामीणमध्ये जेवढी मते लेवा पाटीदार समाजाची आहेत, तेवढीच गुर्जर समाजाची आहेत, ही बाब लक्षात घेऊन गुर्जर व लेवा पाटीदार उमेदवारांची संख्या समान असावी, असा मुद्दा मतदार व काही कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. कोळी समाजातील मतदार अधिक असल्याने किमान चार उमेदवार कोळी समाजाचे असावेत, असाही मुद्दा कार्यकर्त्यांमध्ये चर्चिला जात आहे.

आघाडीचे शेतकरी विकास पॅनल

महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल गठित झाले आहे. त्यात लक्ष्मण (लकी) पाटील, श्यामकांत सोनवणे, सुनील महाजन, मनोज चौधरी, लीना महाजन, पांडुरंग पाटील, नीलेश पाटील, योगराज सपकाळे, दिलीप कोळी, जयराज चव्हाण यांची नावे निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. इतर नावे अद्याप निश्चित झाली नसल्याची माहिती मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे !" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT