Agricultural Produce Market Committee. esakal
जळगाव

Market Committee Election : वर्चस्वासाठी BJPचे जोरदार प्रयत्न; NCPची सत्ता राखण्यासाठी उमेदवारांची चाचपणी

प्रतीक जोशी, सकाळ वृत्तसेवा

भिकन वाणी : सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र या निवडणुकीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी उमेदवारांच्या बैठकी घेत आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांनी देखील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम (धामणगाव) व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व बाजार समितीचे माजी सभापती ॲड. रोहिदास पाटील (बहाळ), माजी उपसभापती महेंद्र पाटील (काकडणे) यांच्याशी चर्चा करून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. (Market Committee Election Strong efforts of BJP for supremacy NCP vetting candidates to retain power jalgaon news)

आमदार चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात तालुक्यातील भाजप सरपंचांची बैठक घेतली, तसेच व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी देखील गेल्या आठवड्यात व्यापारी वर्गाच्या दोन जागांसाठी बैठक घेतली.

चाळीसगाव तालुक्यात गेल्या सहा महिन्यात झालेल्या शेतकरी वर्गाशी संबधित असलेल्या चाळीसगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या पॅनल विरोधात सोसायटीचे मार्गदर्शक व जिल्हा बँकेचे संचालक देशमुख यांचे संपूर्ण पॅनल विजयी झाले.

तसेच राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था निवडणूक, जिल्हा दूध संघ आदी निवडणुकांनंतर आता विद्यमान आमदार चव्हाण यांनी देखील बाजार समिती निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे. पक्षाकडून बाजार समितीसाठी जोरदार मार्चेबांधणी केली जात आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील चाळीसगावच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी राज्य सरकारवर टिकास्त्र सोडत ग्रामीण व शहरातील मतदारांना आमिषे दाखवून, मतदारांना आपल्याकडे वळण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयाच्या वर्कऑर्डरी दिल्या. तसेच अजून १५ हजार कोटी रुपयाचे देणार असल्याचा आरोप केला होता.

बाजार समिती निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राळ उडवून दिली आहे. त्यामुळे आगामी काळात संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोण मुसंडी मारेल, कोणकोणते उमेदवार अर्ज भरतात, याकडे सर्व पक्षीय नेतेमंडळीचे लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT