Marrige News
Marrige News esakal
जळगाव

Jalgaon News : चाळीसगावात विवाह नोंदणी बंद ; विवाह प्रमाणपत्र मिळेना

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : पालिकेचे मुख्याधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांच्यातील वादामुळे येथील नगरपालिकेत गेल्या तीन महिन्यांपासून विवाह नोंदणी बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने मुख्याधिकारी ठोंबरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पालिकेच्या उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे या संदर्भात माहिती देतील, असे सांगितले. त्यांनी ऑक्टोबर २०२२ पूर्वी पालिकाच विवाह नोंदणीचे कामकाज बघत होते.

मात्र जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी २३ डिसेंबर २०२२ ला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना विवाह नोंदणीचे कामकाज करण्याचे आदेश केले असल्याचे त्यांनी सांगितले. (Marriage registration closed in municipality since three months Jalgaon News)

दरम्यान, पत्रात स्पष्ट म्हटले आहे, की ११ नोव्हेंबर २०१६ च्या शासन अधिसूचनेनुसार नागरी क्षेत्रासाठी वैद्यकीय अधिकारी नगरपालिका किंवा वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय यांना नगरपालिका क्षेत्राकरिता निबंधक, विवाह मंडळ आणि विवाह नोंदणी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

जर नगरपरिषद क्षेत्रात ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालय नसेल तर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी विवाह नोंदणीचे काम करावे, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान कुठल्याही शहरात विवाह नोंदणी ही नगरपालिका कार्यालयातच केली जात होती.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. एम. करंबेळकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी यांनी दिलेल्या पत्राबाबत गेल्या ५ जानेवारीला पत्र पाठविले असून, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे, की येथील ग्रामीण रुग्णालयात आकृबंधाच्या अर्धीच पदे भरली असून, सुरू असलेल्या रुग्णसेवेला सांभाळून विवाह नोंदणी कामकाज बघण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ विनंती केली आहे, तसेच त्यासंबंधित कामकाज करण्यासाठी प्रशिक्षित संगणक परिचालक, कर्मचारी, विवाह नोंदणी संबधित फॉर्म, रजिस्टर, फी पावती बुक, संबधित कामासाठी लागणारी स्टेशनरी, ऑनलाइन कामासाठी लागणारा सॉफ्टवेअर, युजर, आयडी, पासवर्ड या कार्यालयात उपलब्ध नाही.

तसेच सद्यस्थितीत कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता, या रुग्णालयास कोविडच्या रुग्ण उपचारासाठी सज्ज राहण्याचे आदेश असून, नियमित रूग्णसेवा सांभाळून, अतिरिक्त कामाचा ताण सर्व कर्मचाऱ्यांवर आहे, वरील सर्व बाबींची पूर्तता झाल्यास सुद्धा, आजपर्यंत हाताळणारा प्रशिक्षित कर्मचारी, एक कुशल कर्मचारी या रुग्णालयास जुन्या आस्थापनेवरून उपलब्ध करून मिळावा, आणि या संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच विवाह नोंदणीचे जबाबदारीचे काम योग्य रीतीने सांभाळता येईल, असे स्पष्ट म्हटले आहे. त्याच्या प्रती जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठविल्या आहेत.

नागरिकांची ससेहोलपट

लग्न करणे सोपे, मात्र त्यानंतर विवाह प्रमाणपत्र मिळविणे अवघड अशी परिस्थिती गेल्या वर्षी विवाह झालेल्या तरुणांची झालेली आहे. कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केल्यानंतरही गेल्या तीन महिन्यांपासून प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT