भोळसर मुलीवर अत्याचार करणाऱ्यास दीड वर्षांची शिक्षा sakal
जळगाव

विवाहितेवर अत्याचार; सासरच्यांच्या अनैतिक कृत्यांचे फुटले बिंग

सासरचे सर्व जण नाशिक येथील असून, या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

भडगाव (जि. जळगाव) : सासरा व पतीच्या मावसभावने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, तसेच इतरांशीही तसेच संबंध ठेवण्यासाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून दबाव होता, असा आरोप करत पांढरद (ता. भडगाव) येथील माहेरी असलेल्या विवाहितेच्या तक्रारीवरून भडगाव पोलिस ठाण्यात बलात्कारासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सासरचे सर्व जण नाशिक येथील असून, या प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरद येथील विवाहितेचा नाशिक येथील पुरुषोत्तम देवरे (रा. पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर पती अश्लील व्हिडिओ दाखवून विवाहितेला त्याप्रमाणेच कृत्य करण्याचा आग्रह धरत होता. त्याला विवाहितेने विरोध केला. ही बाब घरात समजल्यावर त्यांनीही ‘करावेच लागेल, तू बाहेरच्या लोकांशी शारीरिक संबंध ठेवले तर माहेरच्या लोकांनाही पैसे देऊ,’ असे सांगितले. जानेवारी महिन्यात दुपारी दोनच्या सुमारास घरी सासू, दोन्ही नणंदा असताना सासरे विवाहितेच्या बेडरूममधे आले. विवाहिता झोपेत असताना बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, तसेच तोंडात रुमाल कोंबला. तेवढ्यात पतीचा मावसभाऊही तेथे आला. त्यानेही बळजबरीने शारीरिक संबंध केले. याबाबत पतीकडे तक्रार केल्यानंतर पतीने दुर्लक्ष करत त्यात काय बिघडले, असे सांगितले. याशिवाय घरात अनेक बाहेरचे लोक यायचे. सासूच्या बेडरूममध्ये जायचे, एके दिवशी सासूच्या बेडरूमची साफसफाई करताना तेथे अश्लील अल्बम आढळून आले. ही बाब माहेरी आल्यानंतर संबंधित विवाहितेने घरच्यांना सांगितली. याशिवाय गाडीसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून तगादा सुरू होता. त्यावरून विवाहितेच्या तक्रारीवरून सासरे सुधाकर देवरे, मावस दीर मिलिंद पाटील, पती महेश ऊर्फ पुरुषोत्तम देवरे, सासू सरला देवरे, नणंदा दक्षा देवरे, प्रतीक्षा देवरे (सर्व रा. पाथर्डी फाटा, नाशिक), तसेच विवाहासाठी मध्यस्थी करणारे सुभाष पाटील (रा. मुंबई) यांनीही ‘सासरचे मंडळी जे करायला सांगत आहेत, ते कर. ते तुझ्या घरच्यांना पैसे देतील,’ असे सांगायचे. त्यामुळे त्यांच्यावरही भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश वाघमारे तपास करीत आहेत.

मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

या घटनेने मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. ‘आम्ही सर्व तेच काम करतो, तू पण ते कर’ असा दबाव विवाहितेच्या सासरच्या मंडळींकडून होता. याशिवाय घरी सातत्याने बाहेरच्या व्यक्तीही येत असत, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास केल्यास त्यांच्या हाती बरेच काही लागू शकते अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT