sana shaikh esakal
जळगाव

Jalgaon News : उस्मानियॉ पार्कमध्ये विवाहितेची लग्नाचा लाल ड्रेस घालून आत्महत्या

sana shaikh

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : उस्मानियॉ पार्कमधील विवाहितेने मंगळवारी (ता. २८) रात्री नऊच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील मुलगी मोबाईल (Mobile) मागायला आली अन्‌ या घटनेचा उलगडा झाला.

सना तौफीक शेख (वय २१), असे मृत विवाहितेचे नाव आहे. (married woman in Osmania Park committed suicide by hanging herself jalgaon crime news)

तांबापुऱ्यातील कमाल मिस्तरी यांचा मुलगा तौसिफ याच्यासोबत मजीद शेख सांडू (रा. उत्राण, ता. एरंडोल) यांची मुलगी सना हिचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर हे कुटुंब शिवाजीनगरातील उस्मानिया पार्कमध्ये राहण्यास आले.

काही दिवसांपासून कुटुंबात कुरबूर सुरू होती. नातेवाइकांनी सनाचा पती व सासू-सासऱ्याची समजूत घातली. वाद विकोपाला गेल्याने पती पत्नी वेगळे निघाले. चार दिवसांपूर्वीच सनाने आपल्या आईवडिलांशी बोलणे केले. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

शेजारील मुलगी मोबाईल घेण्यासाठी सना शेखकडे गेली. तिने खिडकीतून डोकावून बघितल्यावर हा प्रकार लक्षात आला. शहर पोलिसांनी दार तोडून सना शेख हिला बाहेर काढले. बायको सना हिने लग्नाचा लाल ड्रेस घालूनच गळफास घेतल्याचे दिसताच पती तौफीकला भोवळ येऊन तो खाली कोसळला. त्याला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले.

वैद्यकीय समिती समक्ष शवविच्छेदन

वडील मजीद शेख सांडू, आई शबाना मजीद शेख यांनी मुलगी सना हिचा मृतदेह बघताच आक्रोश केला. पती व सासू-सासऱ्यांनी आत्महत्येला भाग पाडल्याचे मजीद शेख सांडू यांनी सांगितले. सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वैद्यकीय समिती समक्ष शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तपासाधिकारी सहाय्यक फौजदार रवींद्र सोनार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके मुंबई पोलिसांच्या ताब्यात? चहाच्या निमित्ताने मरीन ड्राईव्ह ठाण्यात नेले अन्...

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 ऑक्टोबर 2026

Sugar Prices: साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! साठेबाजीला बसणार आळा; विक्रेत्यांना किती साखर साठवता येईल?

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT