While Deepak was giving water to another active person in the ashram.  esakal
जळगाव

Jalgaon News : गतिमंद दीपक 11 वर्षांनी सापडला हरियानात; रावेर येथील कुटुंबात आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सुमारे ११ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला गतिमंद मुलगा हरियानात सापडला असून, सुरक्षित असल्याची बातमी रावेर पोलिसांनी दिली आणि येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाजन कुटुंबात आनंदोत्सव साजरा झाला. आज शिरसा येथे दीपकच्या वडिलांनी त्याला ताब्यात घेतले. त्या वेळी वडिलांच्या आणि रावेर येथे दीपकच्या आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

येथील शिवाजी चौकातील गतिमंद व मूकबधिर मुलगा अकरा वर्षांपूर्वी हरवला होता. मात्र, त्याच्या हातावर त्याचे नाव, पत्ता गोंदवल्याने तो मिळून आला आहे.

येथील शिवाजी चौकातील पद्माकर महाजन यांचा मुलगा दीपक हा गतिमंद आहे. यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्या हातावर त्याचे नाव व पत्ता गोंदलेला होता. (matimand Deepak found after 11 years in Haryana jalgaon news)

अकरा वर्षांपूर्वी २३ सप्टेंबर २०१२ ला तो हरवला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली. मात्र, तो मिळून आला नाही. यामुळे त्यांनी रावेर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती. महाजन कुटुंबीय सामान्य परिस्थितीत जीवन जगत असून, थोडी शेती करतात. दीपक हरविल्यापासून ते त्याचा शोध घेत आहेत; पण व्यर्थ...

दीपकच्या हातावर त्याचे नाव व पत्ता असल्याने रविवारी (ता. २४) रावेर पोलिस ठाण्यात हरियानातील सिरसा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे जगजितसिंग यांनी दूरध्वनीद्वारे दीपक हा शिरसा येथील भाई कन्हैया मानव सेवा केंद्रात असल्याचे कळविले.

ही माहिती रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी सुनील वंजारी व गोपनीय शाखेचे सचिन घुगे यांनी दीपकच्या आई-वडिलांना दिली. यानंतर जगजितसिंग यांच्याशी संपर्क साधून व्हिडिओ कॉलद्वारे दीपकची भेट त्याच्या आई-वडिलांशी घडवून दिली. या वेळी दीपकच्या आई-वडील व कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे व पोलिसांनी दीपक हरविल्याच्या नोंदीची ११ वर्षांपूर्वीची सत्यप्रत त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केली व दीपकचे वडील पद्माकर महाजन व कुटुंबीय त्याला घेण्यासाठी सिरसाकडे गेले. आज या मानव सेवा केंद्रातून वडिलांच्या ताब्यात देताना तेथील कर्मचारीही गहिवरले.

हातावर गोंदलेल्या नावामुळे उलगडा

गतिमंद दीपक याला बोलता येत नाही व त्याचे काही शिक्षणही झाले नाही. अकरा वर्षांपूर्वी तो घरातून निघून गेला. मात्र, तो शिरसा येथे कसा पोहोचला, हे त्यालाही सांगता येत नाही. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याला अशा अवस्थेत पाहून तेथील स्थानिकांनी या ट्रस्टमध्ये आणले. भाई कन्हैया मानव सेवा ट्रस्टच्या माध्यमातून हा आश्रम चालविला जातो व या आश्रमात अशाच गतिमंद व अनाथ लोकांचा सांभाळ केला जातो. गेल्या दोन वर्षांत दीपक तिथे रुळला होता आणि ट्रस्टच्या कामात अन्य गतिमंद लोकांना जेवण, पाणी देणे अशी मदतही करीत असे.

त्याला स्वतःचे नाव, पत्ता नीट सांगता येत नव्हता. मात्र, त्याच्या हातावर गोंदलेल्या नावामुळे गावाचे नाव कळल्याने तेथील पोलिसांनी रावेर पोलिसांशी संपर्क साधला आणि दीपक पुन्हा आपल्या घराकडे प्रवासाला निघाला आहे. या आश्रमाचे कर्मचारी दीपकच्या वडिलांना घ्यायला तेथील रेल्वेस्थानकावर आले होते. तसेच, त्यांना त्यांनी रेल्वेतही बसवून दिले. त्यांची मानवता पाहून दीपकच्या वडिलांनी त्यांना धन्यवाद दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT