crime
crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : कंपनीत चोरी; तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : एमआयडीसीतील एच. डी. प्रोटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संरक्षक भिंतीखाली भुयार खोदून दीड लाख रुपयांचे साहित्य चोरून नेणाऱ्या तीन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (ता. ९) अटक केली. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्यांची रवानागी पोलिस कोठडीत केली आहे. (MIDC police arrested three suspects who stole materials jalgaon crime)

एमआयडीसीतील एच. डी. प्रोटेक्ट कंपनीतून १ लाख ३२ हजार ३०० रुपयांचे मिडल एल्बो कास्टिंग आणि १३ हजार रुपयांचे एनगॉट ब्राँझ धातूच्या दोन पट्ट्या गायब झाल्याचे घटना बुधवारी (ता. ३) सकाळी उघडकीस आले होते. याबाबत कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन बलवंत कुळकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.

कंत्राटी कामगारांचा प्रताप

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपासाला सुरवात केली. संरक्षण भिंतीला लागून असलेला खड्डा आणि शेजारीच असलेल्या मेाल्डिंग विभागाची पाहणी केली. ही सरंचना माहिती असणाऱ्याने चोरी केली असावी, असा पोलिसांचा अंदाज होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कामावरून सुटलेल्या आणि कंत्राटी कामगारांची माहिती पोलिसांनी घेतली. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, किरण पाटील, इम्रान सय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, ललीत नारखेडे यांनी कंत्राटी पद्धतीने काम करणारा देवानंद ऊर्फ देवा गोकुळ कोळी (वय ३२, रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव) याच्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले.

देवा कोळीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने त्याचे साथीदार विक्की आत्माराम कोळी (वय ३२, रा. सावदा, ता. रावेर, ह.मु. रामेश्वर कॉलनी) आणि ईश्वर श्रावण महाजन (वय ३४, रा. रामेश्वर कॉलनी) यांना अटक केली. त्या तिघांना पोलिस प्रसाद दिल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश जे. एस. केळकर यांनी तिघांना १२ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT