MIDC police is investigating rahul bhil murder jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : रायपूर कंडारीतील तरुणाचा खून? एमआयडीसी पोलिसांचा पावसात तपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : रायपूर कंडारी (ता. जळगाव) येथील तरुणाचा मृतदेह गुरुवार (ता. ६) वाघूर धरणाच्या पाटचारीत कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. राहुल युवराज भिल (वय २४, रा. रायपूर कंडारी ता. जळगाव), असे मृत तरुणाचे नाव आहे.

त्या तरुणाचा खून करून मृतदेह पाटचारीत फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज असून, खुनाच्या दिशेने एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत. (MIDC police is investigating rahul bhil murder jalgaon crime news)

रायपूर कुसुंबा (ता. जळगाव) येथील राहुल भिल वडिलांसोबत वास्तव्याला होता. रविवारी (ता. २) काही लोकांसोबत तो वाघूरच्या दिशेने गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला. तीन ते चार दिवस उलटून राहुल घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांसह नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.

याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद झाली. गुरुवारी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास वाघूर धरणाच्या पाटचारीत कुजलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह राहुल भिल याचाच असल्याचे निष्पन्न झाल्यावरून एमआयडीसी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

संशयित रुग्णालयात

गावातील जयराम कोळी याने त्याचा खून केल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी त्याला मारहाण केली होती. जयराम कोळी बेशुद्धावस्थेत असताना, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला सोडवले आणि जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांचा तपास सुरु

तपासाधिकारी उपनिरीक्षक अनिस शेख, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह गुन्हे शोध पथकाने शनिवारी घटनास्थळासह संपूर्ण परिसर पिंजून काढला. भिल्ल समाजाच्या लोकांचे जाब-जबाब घेण्यात आले. ज्यांनी शेवटी राहुल याला पाहिले होते. त्याच्याकडून माहिती घेण्यात आली.

अहवालाची प्रतिक्षा

मृत राहुल भिल यांचे संपूर्ण शरीर कुजलेल्या अवस्थेत मिळाले असून, शवविच्छेदन अहवालावरून नेमका त्याचा मृत्यू कशाने झाला आहे, याची माहिती आल्यावरच चित्र स्पष्ट होईल, असे तपासाधिकारी उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT