Amalner Agar  esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेर आगाराचे रूप पालटणार; 8 कोटी रुपये मंजूर

एसटी आगाराच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाने आठ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : एसटी आगाराच्या पुनर्बांधणीसाठी महाराष्ट्र शासनाने आठ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. या निधीतून नवीन प्रशासकीय इमारत व विविध सुविधा होणार असल्याने आगाराचे रूप पालटणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून अमळनेर आगाराची दुरवस्था झाली होती. कार्यशाळा देखील अपूर्ण पडत होती. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. (Minister Anil Patil informed that Government of Maharashtra has sanctioned Rs 8 crore for reconstruction of ST Agar jalgaon news)

सांडपाणी निचरा नीट होत नव्हता. त्याच प्रमाणे वाहन तळ मातीचे असल्याने प्रचंड प्रमाणात धूळ उडून एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. म्हणून आगार दुरुस्ती करणे गरजेचे होते.

मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून आठ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवली आहे. गृह विभागाच्या कार्यासन अधिकारी सारिका मेंढे यांनी १४ फेब्रुवारीला शासन निर्णय जाहीर केला आहे.

आठ कोटी रुपयांत कार्यशाळेसाठी १० गाळे, प्रशासकीय कार्यालये, वॉशिंग रॅम्प, वाहन परीक्षक कक्ष, आगार व्यवस्थापक निवासस्थान, वाहनतळ काँक्रिटीकरण, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, आगार विद्युतीकरण, फायर फायटिंग, पेव्हर ब्लॉक आदी विकासकामे करण्यात येणार आहेत.

इमारत पुनर्बांधणी, कार्यशाळा गाळे, प्रशासकीय कार्यालय, वॉशिंग रॅम्प व वाहन परीक्षक कक्षासाठी ३ कोटी १२ लाख, सदनिकांसाठी ३० लाख रुपये, विद्युत, फायर फायटिंग, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था यासाठी ४ कोटी २० लाख ६६ हजार रुपये, काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉकसाठी २ कोटी ७ लाख ६५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

काम सुरू करण्यापूर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा, विस्तृत नकाशा वास्तू विशारदाकडून मंजूर करून कार्यकारी अभियंत्यांकडून मान्यता घ्यावी लागणार आहे. जुने बांधकाम तोडण्याचा खर्च याच रकमेतून करण्यात येणार आहे.

"अमळनेर आगाराला आठ कोटी मिळाल्याने कर्मचारी आणि प्रवासी यांची सोय होणार आहे. त्यानंतर वाढते प्रवासी पाहता नवीन बसेस मिळविण्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे." - अनिल पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT