गिरणा परिक्रमेची जलशक्ती मंत्रालयाकडून दखल sakal
जळगाव

जळगाव : गिरणा परिक्रमेची जलशक्ती मंत्रालयाकडून दखल

बलून बंधारे, पाडळसरे प्रकल्पासाठी मंत्री शेखावतांना साकडे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खासदार उन्मेष पाटील यांनी १ जानेवारीपासून सुरू केलेल्या गिरणा परिक्रमेची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने दखल घेतली आहे. खासदार पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन बलून बंधारे प्रकल्पाचा पंतप्रधान सिंचन योजनेतील समावेशाबाबत आग्रह धरला.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तापी निम्न पाडळसरे प्रकल्पाचा धरण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या प्रवासाचा लेखाजोखा केंद्रीय जलशक्ती मंत्रालयासमोर मांडत कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत तापी निम्न पाडळसरे प्रकल्पाचा समावेश करावा, यासाठी आग्रह धरला.

परिक्रमेबाबत माहिती

खासदार पाटील यांनी गिरणा पुनरुज्जीवन अभियानातून सात बलून बंधारेबाबत जनजागृती करीत गिरणेचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी गिरणा काठावरील ग्रामस्थांशी संवाद साधत असून, सात बलून बंधारेसह तापी निन्म पाडळसरे प्रकल्पाचा पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेशासाठी मंत्र्यांना विनंती केली.

जलशक्ती मंत्रालय अनुकूल

मंत्री शेखावत यांनी पाडळसरे प्रकल्पबाबत प्रधानमंत्री जलसिंचन योजनेत समावेशाबाबत जलशक्ती मंत्रालय अनुकूल असून लवकरच निधीबाबत तरतूद होईल असे आश्‍वस्त केले आहे.

‘बलून’साठी हवी पर्यावरण मान्यता

सात बलून बंधाऱ्यांच्या सर्व मान्यता मिळाल्या असून, आता राज्य सरकारच्या वतीने पर्यावरण मान्यता प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आलात तरच सात बलून बंधाऱ्याच्या निधी मंजुरीचे काम मार्गी लागणार आहे. संपूर्ण निधी हा केंद्र सरकार देणार असून राज्य सरकारने पर्यावरण मान्यतेसाठी लवकर प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यास सात बलून बंधारे प्रस्तावावर देखील लवकर कार्यवाही करण्यात येईल, अशी हमी शेखावत यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT