MLA Anil Patil
MLA Anil Patil esakal
जळगाव

Anil Patil : जिल्हा दूध संघातील भ्रष्ट कारभारावर चाप आणू

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : जळगाव जिल्हा दूध संघात आमची सत्ता आली नसली तरी आम्ही पाच संचालक आगामी पाच वर्षे संघाच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवू व भ्रष्ट कारभारावर चाप आणू, असे सांगत आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या निवडणुकीत मतदार आणि विजयासाठी परिश्रम घेणाऱ्या महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. विजयानंतर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाचा एकच जल्लोष केला. आमदार पाटील यांनी सांगितले, की या निवडणुकीत लागलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. यात माझा विजय झाला असला तरी आमच्या अपेक्षित जागा थोड्या फरकाने गेल्याचे दुःख आहे. (MLA Anil Patil Statement After Winning District Milk Union Election Jalgaon News)

जिल्ह्यात जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा हा विजय आहे. आमचा दूध उत्पादक जगला पाहिजे, हेच धोरण ठेवून आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो होतो. मात्र, जिल्ह्यातील दोन मंत्री व चार आमदारांनी या निवडणुकीत मोठा आर्थिक व्यवहार केल्याने त्यांच्या पॅनलचा विजय झाला. शेतकरी बांधवांच्या हितासाठी सहकार क्षेत्रातील हे प्रकार धोकादायक व निंदणीय आहे.

आमचे प्रमुख उमेदवार परभूत झाले असले तरी आधी बिनविरोध झालेले माजी आमदार दिलीप वाघ व आता निवडून आलेलो चार असे पाचही संचालक अभ्यासू असल्याने येणाऱ्या काळात सर्व कामकाजावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू. दूध उत्पादकांच्या न्यायासाठी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू. या निवडणुकीत विरोधी पॅनलमध्ये जे उमेदवार विजयी झाले, त्यांचे अभिनंदन.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

आता पारदर्शक कारभार करावा, हाच आमचा आग्रह आहे. खरे तर मायक्रो प्लॅनिंगची ही निवडणूक होती. यात ज्याचे प्लॅनिंग चांगले होते तोच उमेदवार विजयी झाला आहे. आमचे बहुतांश उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाल्याने मतदारांनी आमच्या पॅनलला नाकारलेले नाही असे त्यांनी सांगितले.

सुरवातीला निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही सकारात्मकच होतो. पक्षाने आदेश दिला असता तर माघारही घेतली असती.मात्र तसे न घडता निवडणूक लागल्याने आणि विरोधी पॅनलकडून दोन विद्यमान मंत्री आणि चार आमदार मैदानात उतरल्याने राष्ट्रवादीचा एकमेव आमदार म्हणून निवडणूक लढविणे माझी जवाबदारी होती, जी मी स्वीकारली असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, माजी सभापती भोजमल पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT