Latest Marathi News | महाजन, पाटील गटाचा दणदणीत विजय; खडसेंना धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: After the results of the District Milk Development Federation, activists cheering and throwing gulala after the resounding victory of the Farmer Development Panel.

District Milk Union : महाजन, पाटील गटाचा दणदणीत विजय; खडसेंना धक्का

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या गटाने तब्बल १५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांच्या गटाला अवघ्या पाच जागा मिळाल्या आहेत.

खडसेंच्या पत्नी, दूध संघाच्या विद्यमान अध्यक्ष मंदाकिनी खडसे पराभूत झाल्या असून, भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला. राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या या निवडणुकीत दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

जिल्हा दूध संघात खरी लढत भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी अशीच झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया देवकर महिला राखीव गटातून विजयी झाल्या. राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील विजयी झाले. (Mahajan Patil group resounding victory shock to Khadse Jalgaon District Milk Union News)

हेही वाचा: Jalgaon News : पत्नी विरहातून नैराश्यग्रस्त पतीने मृत्युला कवटाळले

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील अवघ्या चार मतांनी पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी पराभव केला. ग्रामविकासमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील मोठ्या फरकाने विजयी झाले. जिल्हा बँकेचे संचालक राष्ट्रवादीतून भाजप-शिंदे गटाकडे गेलेले संजय पवार हे २६९ मते मिळवून विजयी झाले.

गटनिहाय विजयी व पराभूत उमेदवार असे : अमळनेर- आमदार अनिल भाईदास पाटील (महाविकास आघाडी)-२४६ (विजयी), स्मिता उदय वाघ-(भाजप- शिंदे गट)- १८४. भडगाव- रावसाहेब प्रकाश भोसले (भाजप- शिंदे गट )-२३३ (विजयी), संजीव कृष्णराव पाटील (महाविकास आघाडी)- २००. भुसावळ- श्‍यामल अतुल झांबरे- २६३ (विजयी), शालिनी मधुकर ढाके (महाविकास आघाडी)-१६९. बोदवड- मधुकर रामचंद्र राणे (शिंदे भाजप गट)२२० (विजयी), रवींद्र प्रल्हादराव पाटील (महाविकास आघाडी) २१६. चाळीसगाव - प्रमोद पांडुरंग पाटील (महाविकास आघाडी)- २४७ (विजयी), सुभाष नानाभाऊ पाटील (भाजप- शिंदे गट )-१८८. चोपडा - रोहित दिलीप निकम (भाजप शिंदे गट)-२६९ (विजयी), इंदिराताई भानुदास पाटील (महाविकास आघाडी)१६४.

धरणगाव - संजय मुरलीधर पवार -२६९ (विजयी), वाल्मीक विक्रम पाटील (महाविकास आघाडी) १६७. एरंडोल- दगडू धोंडू चौधरी (भाजप- शिंदे गट )२६०, विजयी, भागचंद मोतीलाल जैन (महाविकास आघाडी) २०५. जळगाव- मालती सुपडू महाजन (महाविकास आघाडी)१६२, गुलाबराव रघुनाथ पाटील (भाजप-शिंदे गट)-२७५, विजय, जामनेर- गिरीश दत्तात्रय महाजन (भाजप- शिंदे गट )२७६ (विजयी), दिनेश रघुनाथ पाटील (महाविकास आघाडी)-१५८, मुक्ताईनगर - मंदाकिनी एकनाथ खडसे-( महाविकास आघाडी) १७९, मंगेश रमेश चव्हाण -(भाजप-शिंदे गट) २५५, विजयी. पारोळा- सतीश भास्करराव पाटील (महाविकास आघाडी) २०८, चिमणराव रूपचंद पाटील (भाजप-शिंदे गट) २२७ (विजयी). रावेर- जगदीश लहू बढे (महाविकास आघाडी) १७०, ठकसेन भास्कर पाटील-(भाजप- शिंदे गट )-२६६ विजयी. यावल- हेमराज खुशाल चौधरी (महाविकास आघाडी)१६८, नितीन नारायण चौधरी- (भाजप-शिंदे गट, २६०, विजयी).

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Jalgaon News : अडीच हजार हेक्टर जमिन ओलिताखाली येणार

विमुक्त जाती-भटक्या जमाती- अरविंद भगवान देशमुख (भाजप-शिंदे गट )-२५९ (विजयी), विजय रामदास पाटील (महाविकास आघाडी) १७९. अनुसूचित जाती जमाती- श्रावण सदा ब्रह्मे (महाविकास आघाडी १६१). संजय वामन सावकारे (भाजप-शिंदे गट )-२७६,(विजयी). इतर मागास वर्ग- गोपाळ रामकृष्ण भंगाळे (भाजप शिंदे गट )२०७, पराग वसंतराव मोरे (महाविकास आघाडी, २३० विजयी). महिला राखीव- छाया गुलाबराव देवकर (महाविकास आघाडी, २३५, विजयी), पूनम प्रशांत पाटील (भाजप-शिंदे गट )२५७ (विजयी)- सुनीता राजेंद्र पाटील (भाजप-शिंदे गट )१९२, उषा विश्‍वासराव पाटील (अपक्ष )-०, मनीषा अनंतराव सूर्यवंशी (महाविकास आघाडी)-१६४

दिलीप वाघ नेमके कुणाचे?

पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ हे पाचोरा मतदारसंघातून बिनविरोध विजयी झाले आहेत. ते राष्ट्रवादीचे माजी आमदार असल्यामुळे ते महाविकास आघाडीचेच आहेत, असा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केला आहे. ते महाविकास आघाडीत धरल्यास त्यांची संख्या पाच होत आहे, मात्र भाजप-शिंदे गटानेही ते आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सध्यातरी त्यांच्याबाबत पेच आहेच, त्यामुळे ते कुणाच्या गटाचे आहेत याची सर्वांना उत्सुकता आहे.

हेही वाचा: Jalgaon Crime News : पतंजली योगा प्रशिक्षणाच्या नावाखाली प्राचार्यांची सव्वा लाखात फसवणूक