MLA Mangesh Chavan statement Eknath Khadse allegations are wrong jalgaon news esakal
जळगाव

MLA Mangesh Chavan : एकनाथ खडसेंचे आरोप चुकीचे : आमदार मंगेश चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

MLA Mangesh Chavan : आपण कधीही भंगार विक्रीचा व्यवसाय केलेला नाही. आपण आपल्या कष्टाने कमविले आहे. एकनाथ खडसे यांनी केलेले आरोप चुकीचे आहे, असे मत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी सोमवारी (ता. ३१) येथे व्यक्त केले.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे या वेळी उपस्थित होते. (MLA Mangesh Chavan statement Eknath Khadse allegations are wrong jalgaon news )

श्री. खडसे यांच्या आरोपाला उत्तर देताना आमदार चव्हाण म्हणाले, की एकनाथ खडसे आता काहीही बरळू लागले आहेत. ती एक विकृती आहे. मी कधीही भंगार विकलेले नाही. मी कष्टाने कमविले आहे. राजकारणात आपण गिरीश महाजन यांच्या मदतीने पुढे आलो आहोत.

एकनाथ खडसे यांची आपण कधीही मदत घेतलेली नाही. त्यांना आपण साधा फोनही आजपर्यंत केलेला नाही. आपण प्रामणिकपणे पक्षाचे काम करीत आहोत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांनीच पक्षाशी गद्दारी केली आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित किती शेती आहे, ते शेतीत किती पिकवितात, याची सर्व माहिती आपल्याकडे आहे.

वेळ आल्यावर ती माहिती आपण जाहीर करू. त्याच परिसरात शंभर एकर शेती असलेले शेतकरी आहेत, त्यांना कष्ट करूनही एवढे उत्पन्न मिळत नाही. मात्र, खडसे यांना एवढे उत्पन्न कसे मिळते, हाही एक प्रश्‍न आहे.

जिल्हा दूध संघात त्यांचेही नेतृत्व होते. आज आपण कामकाज करीत आहोत. त्यांच्या व आपल्या काळातील तुलनात्मक अभ्यासही लवकरच दिसून येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT