Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : आयुक्तांनी मनपा फंडातून कामे करावीत; आमदार सुरेश भोळे यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका आता कर्जातून मुक्त झाली आहे. आता दर महिन्याला तीन कोटी रुपये महापालिकेला अधिक मिळणार आहेत.

त्यामुळे आता शासकीय निधीवरच अवंलबून न राहता आयुक्तांनी महापालिका फंडातून रस्ते व इतर कामे करावीत, असे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी मंगळवारी (ता. ४) येथे केले. (MLA Suresh Bhole appealed that Commissioner should do roads and other works from municipal fund jalgaon news)

बळीराम पेठेतील भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार भोळे म्हणाले, की महापालिकेच्या कर्जमुक्तीसाठी आम्ही प्रयत्न केले. आता महापालिका संपूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. त्यामुळे दरमहा तीन कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मिळणार आहे. आता आयुक्तांनी त्या निधीतून शहरातील विविध भागांतील रस्ते, गटारी आदी कामे करावीत. आता शासनाच्या निधीवरच अवलंबून राहू नये.

कामांच्या दर्जाकडे लक्ष द्यावे

शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, त्यांचा दर्जा उत्कृष्ट नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या असल्याचे स्पष्ट करून आमदार भोळे म्हणाले, की रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत आपणही आयुक्तांना, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. याप्रकरणी संबंधित मक्तेदारावर कारवाई करावी, असे त्यांना कळविले आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

त्यांनी त्याची दखल घेऊन कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निधी आणण्याचे काम करतो. मात्र, काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यांनी त्याकडे लक्ष दिले पाहिजे. आता मक्तेदारांनाही वाट सोपी नाही.

त्यांना कामांचे पूर्ण पैसे दिले जाणार नाहीत. पाच वर्षांच्या आत रस्ता खराब झाला, तर त्यांनीच पुन्हा काम करून द्यावयाचे आहे. त्यामुळे रस्ता केल्यानंतर पाच वर्षे त्यांचीच जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे मक्तेदारांनी चांगले काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लवकरच शंभर कोटी येणार

शहराच्या विकासासाठी आम्ही निधी कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट करून आमदार भोळे म्हणाले, की आम्ही शासनाकडे निधीचे प्रस्ताव दिले असून, त्यासाठी पाठपुरावाही करीत आहोत. लवकरच शंभर कोटी रुपयांचा निधी आम्ही जळगावच्या विकासासाठी आणणार आहोत. येत्या काही दिवसांत हा निधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Toilet Hygiene Tips for Women: UTI थांबवण्याची सर्वात सोपी पद्धत; महिलांनी न चुकता फॉलो केल्या पाहिजेत 'या' हायजिन टिप्स

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

SCROLL FOR NEXT