MLA Suresh Bhole esakal
जळगाव

MLA Suresh Bhole : रायसोनी कॉलेज रस्त्यासाठी 10 कोटी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील इच्छादेवी चौक ते रायसोनी कॉलेजपर्यंतच्या रस्त्यासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. यासाठी त्यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे पाठपुरावा केला असल्याची माहितीही दिली.

जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते रायसोनी कॉलेजपर्यंत रस्त्याच्या कामाबाबत वाद सुरू होता. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात मालकीचाही वाद निर्माण झाला होता. (MLA Suresh Bhole Statement 10 crore sanctioned for Raisoni College road Jalgaon News)

त्यामुळे या रस्त्याच्या निधी कोणी खर्च करायचा या वादात या रस्त्याचे कामही होत नव्हते. मात्र, रहदारीसाठी हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हा रस्ता कधी होणार याचीच प्रतिक्षा होती.

अखेर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.याबाबत माहिती देताना आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले, की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकीचा हा रस्ता असून, त्याच्या कामासाठी आपण राज्याचे सार्वजनिक बांधका विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निधीची मागणी केली होती.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

वेळोवेळी त्यांना पत्र पाठवून पाठपुरावा केला. त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य मिळाले. लवकरच निविदा काढून या रस्त्याच्या कामाला सुरवात होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT