Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime : मोबाईल हिसकावणारा भामटा अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीने पलायन करणाऱ्‍या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी परिसरातील उमेश पार्कमधून गुरुवारी (ता. १८) दुपारी अटक केली. राहुल देखनाळे, असे चोरट्याचे नाव आहे.

राहुल देखनाळे चोरीचे मोबाईल विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली. (Mobile snatcher thief arrested by police Jalgaon Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rahul Dekhanale

त्यावरून अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, विजय पाटील, संदीप सावळे, ईश्वर पाटील, उमेशगिरी गोसावी आदींनी राहुल देखनाळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले.

साथीदाराच्या मदतीने दुचाकीवरून दोन्ही मोबाईल पाच ते सात महिन्यांपूर्वी नागरिकांच्या हातातून हिसकावल्याची त्याने कबुली दिली. त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT