Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : मुद्दे संशयास्पद अन्‌ वादही Scripted... गांभीर्य नको!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : काल- परवा जळगाव महापालिकेच्या महासभेत श्रीराम व रावणाच्या मुद्यावरून सत्ताधारी- विरोधकांत गदारोळ झाला. खरेतर राजकीय आखाड्यात, त्यातही जळगाव महापालिकेसारख्या केवळ स्वार्थी राजकारण करणाऱ्या सदस्यांच्या मैदानात तर कुठलीही गोष्ट उत्स्फूर्त नसते.

प्रत्येक मुद्दा, प्रत्येक वाद ठरवून, घडवून आणलेला असतो. त्या प्रत्येक मुद्यामागे राजकारण असते. या वादातही नगरसेवकांचे काहीतरी ‘सेटलमेंट’ नक्कीच असणार. त्यामुळे असे ‘स्क्रीप्टेड’ वाद किमान नागरिकांनी तरी ‘सिरियसली’ घेण्याचे कारण नाही. (Monday column about municipal corporation mahasabha jalgaon news)

उपमहापौरांनी एका संदर्भात रावण श्रेष्ठ असल्याचे म्हटले अन्‌ विरोधी भाजपच्या सदस्यांनी आयतेच कोलीत मिळाले. खरेतर प्रभू श्रीराम अन्‌ रावणात तुलनाच होऊ शकत नाही, पण त्यामुळे उपमहापौरांकडून असे वक्तव्य झाले असेल तर ते निषेधार्हच आहे. कारण, कोणत्याही सार्वजनिक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीकडून अशाप्रकारचे वक्तव्य चुकूनही अपेक्षित नाही.

झालेच तर त्यावर असाच ‘बवाल’ होणार. पहिल्चया दिवशी या विषयावरून महासभा तहकूब करावी लागली. दुसऱ्या दिवशी या वादाचे रस्त्यावर पडसाद उमटले. तहकूब महासभा तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. २३) झाली. त्यातही सुरवातीला गोंधळ आणि नंतर सर्व आलबेल, असा हा राम- रावण वादाचा अंक संपला.

एरवी महासभेत महापौर- उपमहापौरांसह कैलास सोनवणे, अनंत ऊर्फ बंटी जोशी, नितीन लढ्ढा यांच्यासारखे सदस्य नेहमी चर्चेचा विषय ठरतात. या वेळच्या महासभेत केंद्रस्थानी होते उपमहापौर कुलभूषण पाटील, जितेंद्र मराठे, मयूर कापसे आदी.

वादाचे मुद्दे जळगाव शहराच्या विकासकामांशी संबंधित अर्थातच नव्हते. महासभेत ते अपेक्षितही नाही. याचा अर्थ महासभेत विकासावर चर्चा अथवा त्यासंबंधी विषय येत नाही, असे नाही. मात्र, विकासाच्या मुद्यांवर नगरसेवक वाद घालतांय हे चित्र दुर्मिळ असो.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

परवाच्या महासभेतील श्रीराम व रावणाच्या मुद्यावरून झालेले ‘रामायण’ संपले असले, तरी त्यतून मनोरंजनाशिवाय फारसे काही झाले नाही. तहकूब महासभेचे कामकाज पूर्णत्वास येताना शहरातील ५८ कोटींच्या निधीतील कामांचा विषय मार्गी लागला, ही मोठी उपलब्धी म्हणावी लगेल. मात्र, त्यासाठी तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागली.

शहराच्या विकासाची ‘नावापुरती’ काळजी वाहणारे नगरसेवक आपल्या प्रभागातील रस्ते, गटारांसह अन्य विकासकामांच्या विषयावर बोलताना दिसत नाहीत. महासभेतील प्रत्येक गोष्ट माहिती होत नसली, महासभेचे वृत्तांकन प्रसारित होत नसले तरी शहरात मुलभूत सुविधांची कामे होत नाहीत, हे नागरिकांना चांगलेच माहितीये.

त्यामुळे आपले नगरसेवक महासभेत काय करत असतील, याची जाणीवही आहेच सुज्ञांना. स्वाभाविकच राम- रावणातील श्रेष्ठत्व, त्यासंबंधी वक्तव्ये आणि त्यावरून तापवलेल्या कुठल्याही प्रकारच्या मुद्द्यांमधून नगरसेवकांची प्रतिमा काही वेगळी होणार नाही. ‘हे सर्व एकाच माळ्यातील मणी’, अशी सामान्यांची समजूत होणे स्वाभाविक आहे.

त्यामुळे असे वाद उकरून काढत किंवा त्यावर राजकारण तापवत जळगावच्या विकासाच्या मुद्यांना तम्ही ‘बायपास’ करू शकत नाहीत, हे नगरसेवकांनी लक्षात ठेवावे. महापालिका निवडणूक वर्षभरात होतेय, आताच धडा घ्या. विकासावर बोला, कृती करा. या महासभेतील ‘स्क्रीप्टेड’ अंकांवर नागरिक कधीही विश्‍वास ठेवत नव्हते, ठेवणारही नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT