Garbardi dam overflowing near Raver. esakal
जळगाव

Jalgaon : पावसाळी पर्यटनाची क्षेत्र ठरतांय धोकादायक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सध्या सर्वत्र पावसाचा (Rain) जोर कायम असल्याने जळगावसह खानदेशातील अनेक पावसाळी पर्यटनस्थळे धोकादायक बनली आहेत.

अशातही नागरिक अगदी बेपर्वा होत पावसाळी पर्यटनाला बाहेर पडत असून अशा स्थळी प्रशासनाकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (Monsoon tourism area is becoming dangerous jalgaon Latest Marathi News)

त्यामुळे धरणक्षेत्र, धबधबा, डोंगर-दऱ्या आदी ठिकाणी पर्यटनाला गेलेल्या नागरिकांचा जीव धोक्यात येण्याचे प्रकार वाढले आहेत. सोमवारी गारबर्डी धरणावर (सुकी) असाच प्रकार घडल्यामुळे नागरिकांनी याबाबत सजग राहणे गरजेचे आहे.

राज्यभर पावसाचा जोर कायम असताना खानदेश व जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने सर्वत्र हिरवळीचा बहार पसरला आहे. अशा वातावरणात पावसाळी पर्यटनाला निघणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते.

साधारणत: ‘वीकेंड’ला लोक अशा स्थळांकडे प्रवासाला निघतात आणि कोणतीही काळजी न घेता ते पर्यटनाला गेल्यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालतात.

गारबर्डीचे उदाहरणे ताजे
सोमवारी सायंकाळी रावेरजवळील गारबर्डी धरणावर (सुकी) काही तरुण पर्यटनासाठी गेले. धरणात उतरल्यानंतर सायंकाळी अचानक पाण्याचा जोर वाढून हे ९-१० तरुण त्या ठिकाणी अडकले.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला कळविल्यानंतर सावदा पोलिस, रावेर तहसीलदारापासून थेट जिल्हा महसूल विभागापर्यंत सर्वच यंत्रणा कामाला लागली आणि अखेरीस रात्री दहाच्या सुमारास या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

पर्यटनस्थळांवर सुरक्षा नाही

जळगाव जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाची अनेक ठिकाणं असून ती कमालीची प्रेक्षणीय आहेत. त्यामुळे पावसाळ्यात स्वाभाविकच या स्थळांकडे पाय वळतात. मनुदेवी, पाटणादेवीचे धबधबे, गारबर्डी धरण, यावल तालुक्यातील धरणासह हतनूर, वाघुर धरण, कांताई बंधारा आदी जळगाव जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर चांगलीच गर्दी होत असते.

जवळच परंतु, औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या अजिंठा लेणीवरही पर्यटक जात असतात, त्याठिकाणीही धबधबा आहे. पण, यापैकी कुठल्याही पर्यटन स्थळावर आवश्‍यक ती सुरक्षा व्यवस्था नाही.

धरणांवर सुरक्षा, पण..

धरणांच्या ठिकाणी स्थानिक कर्मचारी असले तरी ते पर्यटकांना रोखताना दिसत नाहीत. काही कर्मचारी ड्यूटी बजावताना दिसतात, पण त्यांना अधिकारी, राजकीय पदाधिकाऱ्यांची ओळख दाखवून अनधिकृतपणे प्रवेश मिळविला जातो. अशा वेळी नागरिकांचा जीव धोक्यात येतो.

सातपुड्यातील ठिकाणं

निसर्गाची देणगी असलेल्या सातपुड्याचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसते. सातपुड्यातील अनेक ठिकाणं कमालीची प्रेक्षणीय असली तरी ती प्रवासाच्या दृष्टीने प्रचंड धोकादायकही आहेत. धबधबे व सातपुड्यातील अशा ठिकाणांवर पर्यटकांना रोखणारी यंत्रणा अथवा सुरक्षा व्यवस्था नाही.

प्रशासनाची उदासीनता

एकीकडे अशा पर्यटनस्थळांवर जाताना नागरिक अत्यंत बेपर्वाईने वागतात व स्वत:सह मित्र, कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालतात. दुसरीकडे प्रशासनही अशा स्थळांच्या ठिकाणी यंत्रणा पुरविण्याबाबत उदासीन असते. किमान पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

‘इमर्जन्सी’त धावपळ

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरवायची नाही आणि आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यावर धावपळ करायची, असे प्रशासनाचे धोरण आहे, असे दिसते. सोमवारी गारबर्डी धरणावर अडकलेल्या पर्यटकांच्या बाबतीत नेमके हेच झाले. नागरिकांनीही अशा ठिकाणी जाताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

अशी घ्याल काळजी

- मोठ्या धबधब्यांच्या खाली थांबू नये
- धरणांच्या जवळ जाऊ नये
- प्रवाह कमी असला तरी नदीपात्रात उतरू नये
- पोहता येत नसेल तर नदीजवळही जाऊ नये
- पाण्याचा अंदाज नसेल तर त्यात शिरु नये
- पोहण्याचा मोह टाळावा
- डोंगर- दऱ्यांमध्ये प्रवास करु नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT