mansoon esakal
जळगाव

मान्सून हवामान खात्याचे अंदाज ठरवतोय ‘फोल’

देविदास वाणी

जळगाव : यंदा १०३ टक्के पाऊस होणार आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तीन दिवसांपासून पावसाळा सुरू होईल. नंतर ५, ९ जूनला पाऊस येईल, असे एक ना अनेक हवामान खात्याचे अंदाज मान्सून ‘फोल’ ठरवीत आहे. जिल्ह्यात गुरुवार (ता. ९) पासून पावसाचा अंदाज वर्तविला होता. तोही आता फोल ठरत १२ जूनपासून पाऊस येईल, असे हवामान अभ्यासक सांगतात. बुधवार (ता. ८पासून ‘मृग नक्षत्र’ लागले, तरी पावसाचा ठावठिकाणा नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढू लागली आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वाऱ्याचा वेग वाढला आहे. रात्रीही जोरात वारे वाहतात. तापमान कमी असले, तरी दिवसाचे तापमान ४१ अंशावर अद्यापही कायम आहे. पावसाळा सुरू होऊन तब्बल आठ दिवस उलटले, तरी धरती पावसासाठी आसुसलेली आहे. मृग नक्षत्र लागते, त्यादिवशी तरी पाऊस येतोच, असे जुने जाणकार सांगतात. मात्र यंदा हे नक्षत्रही कोरडे गेले. शेतीवरच सर्व अर्थचक्र अवलंबून असते. पावसाळा लांबला, तर पावसावर अवलंबून असलेल्या अनेक गोष्टी लांबतात. यामुळे शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.

कर्नाटकात मान्सून अटकल्याचे सांगत, आता ११ किंवा १२ जूनला पाऊस सुरू होऊन तापमानात घटीचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अगोदर बियाण्यांची आता पावसाची प्रतीक्षा

खरिपातील बीटी बियाणे मेमध्ये मिळत नव्हते. त्याच्या विक्रीवरच बंदी होती. शेतकऱ्यांना १ जूनपूर्वी बियाण्यांची प्रतीक्षा करावी लागली. आता आठ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा ते करीत आहेत.

"जळगाव जिल्ह्यात मान्सूनला पोषक वातावरण नाही. आकाशात पावसाचे ढगही तयार हेाण्यासारखे वातावरण नाही. यामुळे पाऊस पडत नाही. ११ किंवा १२ जूननंतर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत तापमान ४०-४१ अंश सेल्यिअस राहील."

- नीलेश गोरे, हवामान अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT