Indore bus accident esakal
जळगाव

आईच्या हट्टाने दोन्ही लेकींना जीवदान! ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हतीची प्रचिती’

दोन्ही सख्ख्या बहिणी त्याच अपघातग्रस्त बसने अमळनेरला येणार होत्या.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : आपण नेहमीच मोठ्यांकडे हट्ट करतो व तो बाल हट्ट मोठे व्यक्ती नेहमीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे म्हातारपण एकप्रकारे बालपणच आहे. हाच धागा पकडत इंदूर येथील रहिवासी असलेल्या आजारी वृद्ध आई शांताबाई सूर्यवंशी (वय ७८) यांनी आपल्या आपल्या दोन्ही लेकी अनिता लक्ष्मण पाटील (वय ५०, रा. अमळनेर) व संगीता सुरेश पाटील (वय ४५, गंगापुरी, ता. अमळनेर) यांना अजून एक दिवस राहण्याचा ‘वृद्ध ममत्व हट्ट’ केला अन्‌ त्या दोघींना जाण्याचा बेत रद्द केला. कारण हाच हट्ट अखेर त्यांना जीवदान देणारा ठरला. कारण दोन्ही सख्ख्या बहिणी त्याच अपघातग्रस्त बसने अमळनेरला येणार होत्या. मात्र, ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’, याचाच प्रत्यय आला. (Indore MSRTC bus accident)

आमोदा (ता. जळगाव) येथील मूळ रहिवासी असलेले निवृत्त पोलिस उपनिरीक्षक देविदास वामन सूर्यवंशी (वय ८३) आपल्या तिन्ही भाऊ व मुलासमवेत इंदूर येथेच स्थायिक झाले आहेत. त्यांच्या पत्नी शांताबाई सूर्यवंशी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांना पाहण्यासाठी व तब्येतीची विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्रातून दोन्ही लेकी गेल्या आठवड्यात इंदूरला गेल्या होत्या. ‘मातृसेवा’ केल्यानंतर त्या दोन्ही बहिणी अपघातग्रस्त बसने अमळनेरला येणार होत्या. मात्र, त्याच वेळेस वृद्ध आईने ‘एक दिवस तरी थांबा’, असा हट्ट धरला.

त्यानंतर अनिता पाटील यांनी आपले पती निवृत्त शिक्षक एल. एस. पाटील (रा. आदर्शनगर, अमळनेर) यांना भ्रमणध्वनी वरून येण्याचा बेत रद्द झाल्याचे सांगितले. अन जेव्हा काही तासांतच इंदूर-अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळल्याची बातमी दोघींकडे गेली. त्यावेळेस सर्वांचाच हृदयाचा ठेका चुकला. सर्वांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. रडावे की हसावे, असा प्रश्न त्यावेळेस दोन्ही लेकींसह वृद्ध मातापित्यांना पडला होता. जीवनाची दोरी बळकट असली, की ‘यम’ही आपले काही बिघडू शकत नाही. जणू काही वृद्ध आईने आपल्या दोन्ही लेकींसाठी परमेश्वराकडून जीवदान मागून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT