Dignitaries along with awardees at the agricultural exhibition organized by 'Agroworld'. esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : शेती टिकविण्यासाठी चळवळीत सहभागी व्हा : खासदार उन्मेष पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : जोपर्यंत आपण नवीन गोष्टी स्वीकारत नाही, तोपर्यंत चांगली शेती होऊ शकत नाही. विचारातून आणि नवीन स्वीकारण्यातून क्रांती होत असते.

‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’च्या कृषी प्रदर्शनातून आपण असे नवतंत्रज्ञान मिळवू शकतो. ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’ ही नुसती संस्था नसून, शेतीसाठीची चळवळ आहे आणि आपण या चळवळीत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले.(MP Unmesh Patil statement of Joint movement to save agriculture jalgaon news)

जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे ३ ते ६ नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या (ता. ४) दिवशी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी केंद्र संचालक, शेतकरी गट आदींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी खासदार पाटील बोलत होते. श्रीराम उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, प्लॅन्टो कृषी तंत्रचे निखिल चौधरी, मेट्रोजेनचे प्रियांक शहा, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, कृषी विभागाचे निवृत्त कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अ‍ॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी उद्योजक श्रीराम पाटील यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्काराने नऊ जणांचा, अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श कृषी केंद्र संचालक पुरस्काराने चौघांचा, अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी ऋषी पुरस्काराने दत्तात्रय पाटील यांचा, तर अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श सहकारी पुरस्काराने राणी नाना राठोड आदींचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सुमारे ३० हजार शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT