st msrtc  esakal
जळगाव

MSRTC News: बसचालक- वाहकांच्या मुक्कामाचे तिन तेरा; डासांमध्ये काढावी लागते रात्र

सकाळ वृत्तसेवा

वावडे (ता. अमळनेर) : राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीच्या चालक, वाहकांना खेडेगावी मुक्कामी बस घेऊन गेल्यानंतर भौतिक सुविधांअभावी गैरसोयीचा सामना करण्याची वेळ आली आहे.

राज्य परिवहन महामंडळातील चालक, वाहक हे दिवसभर प्रवाशांची ने- आण करतात. रात्री ही बस कुठेतरी खेड्यागावात मुक्कामी गेल्यानंतर त्या ठिकाणी चालक, वाहकांना झोपण्याची सोय नसते? सकाळी आंघोळीला पाणी नसते? स्वच्छतागृह नसते? अशा अनेक गैरसोयीचा सामना करत सध्या आष्टी आगारातील चालक, वाहक कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.

मुक्कामी बस घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी चालक, वाहकांना हक्काचा निवारा देखील नसल्यामुळे नाईलाजास्तव चालक वाहकांना बसमध्येच मुक्काम ठोकावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी तर मच्छरांमध्येच रात्र काढावी लागते.

हेही वाचा: अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

एकीकडे चोवीस तास एसटीची चालक, वाहक हे कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. परंतु रात्री खेडेगावात मुक्कामी बस घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी चालक, वाहकांचा सामना हा गैरसोय होत असल्यामुळे आगारप्रमुखांनी खेडेगावात मुक्कामी बस घेऊन गेलेल्या वाहक, चालकांची गैरसोय लक्षात घेता त्या ठिकाणी चालक, वाहकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

सकाळी लोटा घेऊन उघड्यावर?

मुक्कामी ठिकाणी हक्काचे स्वच्छतागृह नसल्यामुळे नाईलाजास्तव वाहक, चालकांना सकाळी लोटा घेऊन बाहेर उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे.

जेवण बसमध्येच..

रात्रीला खेडेगावी मुक्कामी ठिकाणी जेवण करण्यासाठी देखील जागा नसल्यामुळे बसमध्ये जेवण करावे लागते. कधीकधी तर बस अस्वच्छ असेल तर जेवण निम्मेच करून हात धुवासा वाटत असल्याचे सुद्धा चालक वाहकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT