jalgaon roads esakal
जळगाव

जळगावात हेलिकॉप्टर सेवा आवश्‍यक; चिखलमय रस्त्यामुळे चालणेही अवघड

पावसाळ्यापुरती तरी या भागात हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याची गरज परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शिवाजीनगर पुलाच्या कामाची संथगती, त्यातच या भागातील रस्त्यांची अवकळा झाली आहे. सर्वत्र चिखलच चिखल झाला आहे. त्यामुळे वाहन तर सोडूनच द्या, पायी चालणेही अवघड झाले आहे. पावसाळ्यापुरती तरी या भागात हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याची गरज परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (Latest marathi news)

शिवाजीनगरच्या विकासकामांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांत या भागात कोणतेही काम झालेले नाही. रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या कामाबाबत अनेक वेळा नागरिकांनी मागणी केली. त्यासाठी महापालिकेवर मोर्चाही काढण्यात आला, तसेच आंदोलनेही करण्यात आली. मात्र पदाधिकारी व महापालिका प्रशासनाने काम करण्याकडे लक्ष दिले नाही.

रस्त्यांची अवस्था बिकट

शिवाजीनगरातील सर्वच भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. लाकूडपेठ ते शिवाजीनगरातील ख्रिचन स्मशानभूमीलगत रेल्वेपटरीपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त करण्यात आलाच नाही. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलच चिखल झाला आहे.

हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याची स्थिती

पावसाळ्यात रस्त्याची अवस्था चिखलमय झाल्यामुळे आता या भागातून वाहनेही चालविता येत नसल्याने व पायी चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर आता थेट हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने पावसाळ्यासाठी तरी या रस्त्यावर ही सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिक संतप्त भावनेने करीत आहे.

रस्ता दुरुस्ती का झाली नाही?

महापालिकेत तब्बल १७० कोटी रुपयांच्या निधीची कामे आहेत. त्यात या रस्त्याचा समावेश करून त्याचे काम करण्यात आले नाही, असा प्रश्‍नही या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. शिवाजीनगर भागातील नागरिक ‘कर’ भरतात आणि ‘मतदान’ ही करतात. मग महापालिका त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्‍नही नागरिक करीत आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास

शिवाजीनगरातील लाकूडपेठ भागातील रस्त्याची अवस्था बिकट आहे. याच भागात खुबचंद सागरमल विद्यालय आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठीही अत्यंत कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून ‘पायी चालवून दाखवा आणि बक्षीस मिळवा’, अशी स्पर्धा लावली तरी कोणीही तयार होणार नाही, अशी स्थिती या रस्त्याची आहे.

''शिवाजीनगरातील सर्वच भागातील रस्ते खराब झाले आहेत. दगडाचा कच टाकून रस्ता दुरुस्तीचे आश्‍वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. जर त्यांनी काम केले नाही तर आपण तीव्र आंदोलन करणार आहोत.'' - विजय बांदल, शाखाप्रमुख शिवसेना, शिवाजीनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

लग्नानंतर बलात्काराचा गुन्हा रद्द! आरोपी, तक्रारदार तरुणीत प्रेमाचे नाते, न्यायालयाचे निरीक्षण

Hapus Mango Price : आंबाप्रेमींसाठी मोठी बातमी! हवामानातील बदलामुळे हापूसच्या दरात मोठी घसरण; बाजारात काय आहेत ताजे भाव?

SCROLL FOR NEXT