Jalgaon News esakal
जळगाव

Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या प्रश्‍नांबाबत आज मुंबईत होणार बैठक

सकाळ वृत्तसेवा


जळगाव :
जिल्ह्यातील उद्योग-व्यापार क्षेत्राच्या विविध प्रलंबित प्रश्‍नांसंबंधी गुरुवारी (ता. ९)विशेष बैठक होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी व जळगाव जिल्हा विकास परिषदेच्या संयोजिका संगीता पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे १६ फेब्रुवारीस जळगाव जिल्हा विकास परिषद झाली. या परिषदेत जिल्ह्याच्या उद्योग व व्यापार क्षेत्राच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली होती. या परिषदेत उद्योग मंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात मुंबईत बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक होत आहे.

बैठकीस आमदार सुरेश भोळे, उद्योग मंत्रालयाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कामगार मंत्रालयाचे प्रधान सचिव विनिता सिंगल, दीपेंद्र कुशवाह, औद्योगिक विकास महामंडळाचे सीईओ विपिन शर्मा, महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, जिल्हाधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT