जळगाव

तर.. गाळेधारक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार 

भूषण श्रीखंडे

जळगाव ः बी.जे. मार्केट येथे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत पाटील हे कर्मचाऱ्यांचा सोबत येत सक्तीने थकबाकी भरणे व गाळे जप्ती करण्याचे धमकी देत आहे. गाळेधारकांनी दिलेले  अवाजावी बिल भरू शकत नसून आता महापालिका प्रशासन गाळे नुतणीकरण व लिलाव करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे गाळेधारकांवर महापालिका प्रशासन अन्यया करत आहे. त्यामुळे सर्व गाळेधारक कुटूंबासह रस्त्यावरून आंदोलन करणार असा इशारा गाळेधारकांनी बैठकीतून महापालिका प्रशासनाला दिला आहे. 

शुक्रवार डॉ.शांतारामदादा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शाहू मार्केट येथे बैठक झाली. बैठकीत माजी नगराध्यक्ष बंडू काळे, भाजप गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे उपस्थित होते. या सर्वांना डॉ. शांतारामदादा सोनवणे यांनी विनंती केली की, जोपर्यंत महाराष्ट्रातील २७ महानगरपालिका यांच निर्णय शासन दरबारी लागत नाही तोपर्यंत प्रशासनातर्फे गाळेधारकांवर होत असलेल्या कारवाईस विरोध करावा तसेच दूरध्वनीवर आमदार सुरेश भोळे यांना सुद्धा या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

रस्त्यावर उतरणार... 
मनपाला उत्पन्नाचे इतर शेकडो स्त्रोत असतानाही प्रशासन गाळेधारकांच्या मुळावर उठले आहे. महामारीच्या काळात गाळेधारक फार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला असतानाही मनपा प्रशासन पशुतुल्य वागणुकीने आमचा संसार देशोधडीला लावणार असेल तर आम्हीही हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू. कोरोना काळातील या जमावाला मनपा प्रशासन जबाबदार असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT