jalgaon municipal corporation esakal
जळगाव

MIDC मध्ये प्लॅस्टिकबॅगवर कारवाई; 35 टन माल जप्त

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विरोधी पथकाने शनिवारी रात्री एमआयडीसीत कारवाई करत ३५ टन प्लॅस्टिक बॅग जप्त करुन गोदाम सील केले.

शनिवारी सायंकाळी ७ वाजेपासून आयुक्त गायकवाड यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरु झाली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय ठाकूर यांच्या पथकाने डी- सेक्टर मधील डी-५५ येथील अनिल मदनदास गेरडा यांचे मालकीच्या गुदामाची तपासणी केली.

त्यात फार मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक पिशव्या प्लॅस्टिक ‘ग्लास प्लेट’चा साठा अंदाजे एकूण ३० ते ३५ टन प्लास्टिक कॅरिबॅग आढळून आल्या. त्यानुसार हे गोदाम सील करण्यात आले. या पथकात साजीद अली, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव व आरोग्य निरीक्षक जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे, अर्जुन पवार, मुकाद विक्की डोंगरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT