Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Municipal Corporation : महापौरांतर्फे उद्या होणार कामकाजांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापौर जयश्री महाजन यांनी नोव्हेंबर महिन्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाला कामाचे यादीनिहाय उद्दिष्ट दिले होते. ती कामे झाली किंवा नाही आणि झालेली नसतील, तर त्याचे कारण काय, याचा सविस्तर आढावा गुरुवारी (ता. १९) घेण्यात येणार आहे.

महापौर जयश्री महाजन यांच्या दालनात सकाळी अकराला बैठक होणार आहे. ही बैठक विभागनिहाय होणार असून, त्या दिवशी कोणत्याही अधिकाऱ्यांना सुटी देऊ नये, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली आहे. (Municipal Corporation mayor inspect work tomorrow Jalgaon News)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

महापौर जयश्री महाजन यांनी २२ नोव्हेंबर २०२२ ला सकाळी अकरापासून, तर सायंकाळी सहापर्यंत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी तत्कालीन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड उपस्थित होत्या.

त्यांनी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाचे यादीनिहाय उद्दिष्ट दिले होते. या कामांची आपण पूर्तता करून अहवाल तयार करावा, असेही त्यांना सांगितले होते. त्यानुसार आता दोन महिने पूर्ण होत असून, त्या सर्व कामांचा आढावा प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जाणार आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक कामाचा लेखी अहवाल आहे, तसेच कामे का झाली नाहीत, याचाही तपशील मागविण्यात आला आहे. अशा प्रकारची बैठक महापालिकेत प्रथमच होत आहे. त्यामुळे दिलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांचे काय उत्तर असेल, याकडेच आता लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Latest Marathi Breaking News: कामातील निष्काळजीपणा भोवला, दोन अभियंते निलंबित

SCROLL FOR NEXT