Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Municipal Corporation News : आयुक्त नियुक्तीची सुनावणी पुढे ढकलली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका आयुक्तपदी नियुक्तीबाबत ‘मॅट’मध्ये सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी (ता. ११) सुनावणी होऊन निकाल लागण्याची शक्यता आहे.

महापालिका आयुक्तपदाचा पेच निर्माण झाला आहे. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली. त्यांचा पदभार परभणीचे आयुक्त देविदास पवार यांना देण्यात आला आहे. मात्र, डॉ. विद्या गायकवाड यांनी आपल्या बदलीला ‘मॅट’मध्ये आव्हान दिले असून, त्याची सुनावणी औरगांबाद येथे ‘मॅट’मध्ये सुरू आहे. (Municipal Corporation Updated Commissioner appointment hearing postponed Jalgaon News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

मॅटने आयुक्त गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली आहे. मात्र, पदभार त्यांच्याकडे न देता देविदास पवार यांच्याकडे दिला आहे. मात्र, त्यांनाही काही अटी शर्ती लावण्यात आल्या आहेत. आयुक्तपदी कोण राहणार, याचा निकाल ‘मॅट’मध्ये लागणार आहे.

मात्र, सध्या केवळ सुनावणीच्या तारखा पडत आहेत. आतापर्यंत पाच तारखा पडल्या आहेत. मंगळवारीही निकालाची शक्यता होती. मात्र, आयुक्त देविदास पवार यांचे वकील गैरहजर असल्यामुळे मंगळवारी कोणतेही कामकाज झाले नाही. आता ही सुनावणी बुधवारी (ता. ११) दुपारी तीननंतर होणार असल्याचे सांगण्यात आले असून, निकाल लागण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT