adv chavan esakal
जळगाव

MVP Case : ॲड. चव्हाणांचा जेलमधील मुक्काम वाढला; पोलिस कोठडीसाठी सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘मविप्र’चे मानद सचिव नीलेश भोईटे यांच्या घरावर पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्याप्रकरणी ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या पाच दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी तपासाधिकाऱ्यांनी न्यायालया(Court) केली. (mvp case Ad Chavan stay in jail extended revision application in Sessions Court for police custody jalgaon news)

मात्र, न्यायालयाने पोलिस कोठडी नाकारली. त्या विरोधात सरकार पक्षाने रिव्हीजन अर्ज सादर केला आहे. ॲड. चव्हाण यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. तोपर्यंत ॲड. चव्हाण यांना कारागृहातच दिवस काढावे लागणार आहेत.

अ‍ॅड. विजय पाटील यांच्या ताब्यातून संस्था मिळवण्यासाठी त्यांना पुण्यात बोलावून नंतर अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल होता. तो गुन्हा कोथरुड (पुणे) पोलिसांत वर्ग झाला आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

याप्रकरणी पुणे पोलिसांनी ९ जानेवारी २०२२ ला नीलेश भोईटे यांच्या भोईटेनगरात छापा टाकला होता. हे सर्व कट कारस्थान ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ॲड. प्रवीण चव्हाण विशेष एसआयटी समक्ष उपस्थित राहिले असताना, त्यांना अटक केली होती.

कोठडीविरुद्ध रिव्हीजन

न्यायाधीश आर. वाय. खंडारे यांनी सरकार पक्षाची पोलिस कोठडीची मागणी फेटाळून ॲड. चव्हाण यांना न्यायालयीन कोठडीत रवाना केले होते. त्या विरोधात सरकार पक्षाने सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल केला आहे. न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात काम सुरू आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. गोपाल जळमकर यांचा गुरुवारी युक्तिवाद झाला. शुक्रवारी (ता. ३) त्यावर उर्वरित काम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT