MNS activists protesting at the collector's office demanding that paramilitary martyrs' bravery should be engraved on the martyr's memorial.
MNS activists protesting at the collector's office demanding that paramilitary martyrs' bravery should be engraved on the martyr's memorial. esakal
जळगाव

Jalgaon News : हुतात्मा स्मारकावर हवी निमलष्करी जवानांची नावे; मनसेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्य

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मेहरुण तलाव परिसरात होणाऱ्या हुतात्मा स्मारकावर केवळ सैन्यातील शहीद जवानांच्या नावांचा उल्लेख न करता निमलष्करी जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण व्हावे म्हणून त्यांचीही नोंद करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. (Names of paramilitary soldiers will be on Martyrs Memorial mns demand accepted jalgaon news)

यासंदर्भात मनसेतर्फे शुक्रवारी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही मागणी मंजूर करण्याचे आश्‍वासनही दिले.

जिल्ह्यात निमलष्करी दलातील शहीद जवानांची संख्या खूप मोठी असून, त्यांची अधिकृत यादी जिल्हा सैनिक मंडळात उपलब्ध नाही. बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एआर अशा विविध निमलष्करी दलात जिल्ह्यातील शेकडो तरुण देशसेवा बजावत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामधील अनेकांना वीरमरण प्राप्त झाले आहे. शासनाच्या नियमानुसार त्यांना शहीदचा दर्जा दिला जात नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे.

प्राप्त माहितीनुसार जिल्हा प्रशासनाला १८ शहीद जवानांची यादी प्राप्त झाली आहे. ती सैन्य दलातील जवानांची आहे. त्यांची शौर्यगाथा हुतात्मा स्मारकांवर साकारली जाणार असेल, तर निमलष्करी दलातील शहीद जवानांची शौर्यगाथाही स्मारकावर साकारली जावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

याप्रसंगी विनोद शिंदे, ललित शर्मा, चेतन पवार, सतीश सैंदाणे, महेंद्र सपकाळे, राजेंद्र निकम, विकास पाथरे यांच्यासह निवृत्त निमलष्करी दलाच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT