Jalgaon: NCP Congress workers burning a symbolic effigy of Minister Girish Mahajan on Tuesday in protest against his offensive statement against Nikhil Khadse.  esakal
जळगाव

Jalgaon News : राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाळला मंत्री महाजनांचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता. २१) निखिल खडसे यांच्या मृत्यूबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र शब्दांत निषेध करत महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मंगळवारी (ता. २२) दहन केले.

लोकनेते आमदार एकनाथराव खडसे यांचे पुत्र (कै.) निखिल खडसे यांच्या मृत्यूविषयी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बेजबाबदार वक्तव्य करत शंका उपस्थित केली होती.(NCP burn effigy of Ministers Mahajan Jalgaon News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

एखाद्या दिवंगत व्यक्तीबद्दल अशाप्रकारे वक्तव्य करून वाद निर्माण करण्याचे खालच्या पातळीवरचे राजकारण महाजन करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी केला.

जिल्ह्यात फिरू देणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर गिरीश महाजन यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला चपला, जोडे मारून पुतळ्याचे दहन केले. महाजन यांनी असे द्वेषपूर्ण वक्तव्य करणे बंद करावे, अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला. याप्रसंगी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, युवक अध्यक्ष रिकू चौधरी, युवती जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT