Eknath Khadse vs Chandrakant Patil esakal
जळगाव

Political News : चंद्रकांत पाटलांनी पाच-दहा वर्षे कशाला, आत्ताच निवृत्ती घ्यावी - एकनाथ खडसे

पुढील शंभर वर्षांची दृष्टी आपल्याकडं नाही आणि आपल्याला त्यात रसही नाही : चंद्रकांत पाटील

सकाळ डिजिटल टीम

पुढील शंभर वर्षांची दृष्टी आपल्याकडं नाही आणि आपल्याला त्यात रसही नाही : चंद्रकांत पाटील

जळगाव : राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जोरदार टीका केलीय.

'पाच, दहा वर्षे कशाला पाहिजे? आताच घ्या ना,' अशा शब्दांत खडसेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय. चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच पाच ते दहा वर्षांनंतर निवृत्ती घेणार असल्याच्या आशयाचं वक्तव्य केलं होतं, यावरून खडसेंनी पाटलांना हा टोला लगावला.

खडसे म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, ते विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. गेल्या काळात पक्षानं त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र, आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावं, या वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे असे वाटल्याने राजकारणापासून वेगळे होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पुण्यातील एसएनडीटी विद्यापीठात चंद्रकांत पाटील यांनी भाषणादरम्यान एक वक्तव्य केलं. पुढील शंभर वर्षांची दृष्टी आपल्याकडं नाही आणि आपल्याला त्यात रसही नाही. कारण, आपल्याला अजून ५-१० वर्ष काम करुन जायचंय, असं पाटील बोलण्याच्या ओघात म्हणाले. परंतु, त्यावरुन चंद्रकांत पाटलांना निवृत्तीचे वेध लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT