neet
neet esakal
जळगाव

NEET UG 2023 Admission: ‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’च्या 150 वर जागा अद्याप रिक्त; महाविद्यालयांची न्यायालयात दाद

सकाळ वृत्तसेवा

NEET UG 2023 Admission : ‘नीट- यूजी २०२३’च्या प्रवेशप्रक्रियेत ग्रुप ‘बी’अंतर्गत ‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’, ‘बीयूएमएस’ची प्रवेशप्रक्रिया ‘सीईटी- सेल’च्या वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबरला संपली. यंदा ‘स्पॉट राउंड’ न झाल्याने ‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ विद्याशाखांच्या जागा रिक्त आहेत.

त्यातच काही नवीन महाविद्यालयांना मंजुरी मिळाल्याने या महाविद्यालयांसह रिक्त जागा भरण्यासाठी प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ मिळावी, यासाठी महाविद्यालयीन संघटनेने न्यायालयात दाद मागितली आहे.

मध्यवर्ती परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या सीईटी-सेलने महाराष्ट्रात ग्रुप ‘ए’मधील एमबीबीएस, बीडीएस, ग्रुप ‘बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, तर ग्रुप ‘सी’मधील बीपीटीएच आणि अन्य विद्याशाखांची प्रवेशप्रक्रिया जुलै २०२३ पासून राबवली. (NEET UG 2023 Admission 150 seats vacant in BAMS BHMS news)

त्यात सर्वांत अगोदर ग्रुप ‘ए’मधील प्रवेशप्रक्रिया आटोपली. नंतरच्या टप्प्यात ग्रुप ‘सी’ व शेवटी ‘सीईटी- सेल’च्या २६ नोव्हेंबरच्या अखेरच्या सूचनेनुसार ‘ग्रुप बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस या तीन विद्याशाखांची प्रक्रिया ३० नोव्हेंबरला संपली.

नव्या महाविद्यालयांना कमी दिवस

प्रवेशप्रक्रियेत ग्रुप ‘बी’मध्ये तीन ‘कॅप राउंड’नंतर पाच ‘स्ट्रे व्हॅकन्सी’ म्हणजे, रिक्त जागांची फेरी झाली. त्यातील तिसऱ्या फेरीअगोदर नव्या नऊ आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने ते सीईटी-सेलच्या यादीत आले. तिसऱ्या फेरीनंतर आणखी दोन नव्या महाविद्यालयांना मान्यता मिळून त्यांची नावे यादीत आली. अशा या नव्या ११ महाविद्यालयांना त्यांच्या जागा भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.

‘स्पॉट राउंड’ झाला नाही

रिक्त जागांसाठी ‘स्ट्रे व्हॅकन्सी राउंड’द्वारे विद्यार्थ्यांना जागा मिळाली. मात्र, काही विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता जागा सोडली. अशा अनेक जागा नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये आजही रिक्त आहेत. त्यांची संख्या जवळपास १५० वर आहे. त्यात काही ‘स्टेट’ कोट्याच्या व काही इन्स्टिट्यूशनला कोट्याच्या जागा आहेत.

‘स्पॉट राउंड’ न झाल्याने पाचव्या फेरीनंतरही ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले नाही, ते सर्वच विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. ‘स्पॉट राउंड’ झाला असता, तर त्यातील काहींना प्रवेश मिळाला असता व महाविद्यालयांच्या इतक्या जागाही रिक्त राहिल्या नसत्या, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गुजरातप्रमाणे हवी मुदतवाढ

आता ‘स्ट्रे व्हॅकन्सी राउंड’च्या दरम्यान नव्याने जी ११ आयुर्वेद महाविद्यालये यादीत आली व त्यात जवळपास १०० वर जागा अजून रिक्त आहेत, त्या जागा भरण्यासाठी या महाविद्यालयांना ‘स्पॉट राउंड’ची मान्यता व प्रवेशप्रक्रियेसाठी मुदतवाढ हवी आहे. त्यासाठी महाविद्यालयांची संघटना न्यायालयात गेली. गुजरातमध्ये अशा प्रकारे जागा भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

आणखी महाविद्यालयांना मान्यता

आयुर्वेद महाविद्यालयांना मान्यता देणाऱ्या केंद्र सरकारच्या ‘एनसीआयएसएम’ या यंत्रणेच्या ‘साइट'वर महाराष्ट्रातील आणखी पाच ते सहा आयुर्वेद महाविद्यालयांची नावे दिसत आहेत. सीईटी-सेलच्या अंतिम समिती तपासणीनंतर या महाविद्यालयांना ‘कोड’ मिळून ती प्रवेशप्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. त्यापैकी दोन महाविद्यालयांना ‘कोड’ मिळाला. त्यामुळे सीईटी-सेलला प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ द्यावीच लागेल, असे दाद मागणाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘स्पॉट राउंड’चा आग्रह

न्यायालयीन निर्देशानुसार रिक्त जागा भरण्यासाठी प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ मिळाली व आणखी काही महाविद्यालये नव्याने यादीत आल्यास पुन्हा ऑनलाइन फेरी घ्यावी लागणार आहे. मात्र, त्यातूनही जागा रिक्त राहत असतील अथवा त्या रिक्त राहण्याचीच शक्यता अधिक असल्याने ऑनलाइन फेरीनंतर एक ‘स्पॉट राउंड’ घेणे आवश्‍यक राहील. कारण, त्याशिवाय रिक्त जागा भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे सीईटी-सेलने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, प्रक्रियेस मुदतवाढ देण्यासह ‘स्पॉट राउंड' घ्यायला हवा, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT