NMU News esakal
जळगाव

NMU Update : उमवि शिक्षणशास्त्र प्रशाळेत नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षणशास्त्र प्रशाळेत संशोधन पेपर लेखन आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाचे उपयोजन या दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरवात झाली आहे.

पदव्युत्तर स्तरावरील शिक्षणात संशोधन विषयास महत्त्व असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि संशोधकांना शोधनिबंध लेखनासंदर्भात शास्त्रीय ज्ञान प्राप्त व्हावे, तसेच त्यांची संशोधनासंदर्भातील वैज्ञानिक दृष्टी विकसित व्हावी, यासाठी ‘संशोधन पेपर लेखन’ या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. (New Certificate Course in NMU Faculty of Education Jalgaon News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम दोन महिने कालावधीचा आहे. यात प्रवेशित विद्यार्थ्यांना संशोधन पेपर लेखन कसे करावे, याबद्दल माहिती दिली जाणार आहे. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्क एक हजार रुपये आहे. याचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने शनिवारी आणि रविवारी घेतले जातील.

विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि संशोधकांना तंत्रज्ञानाभिमुख बनवून त्यांना तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक उपयोजनासंदर्भात जागरूक करून त्यांना आवश्यक कौशल्य संपादनासाठी सहाय्यक होईल, यासाठी ‘शैक्षणिक तंत्रज्ञानाचे उपयोजन’ या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरवात करण्यात आली आहे.

या अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्क १५०० रुपये असून, हा अभ्यासक्रम ब्लेंडेड मोडने सुरू राहील. इच्छुकांनी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेश निश्चित करावा. माहितीसाठी डॉ. स्वाती तायडे यांच्याशी ९३०७४४५०६४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT