Collector Aman Mittal while guiding the review meeting of Development Council by Maharashtra Chamber of Commerce
Collector Aman Mittal while guiding the review meeting of Development Council by Maharashtra Chamber of Commerce  esakal
जळगाव

Jalgaon New MIDC : नवीन एमआयडीसी जागेची निश्‍चिती 15 जूनपर्यंत होणार : जिल्हाधिकारी मित्तल

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरतर्फे फेब्रुवारीत जळगाव जिल्हा विकास परिषद घेण्यात आली. त्यात, जळगावात नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत ठरले होते.

त्यानुसार नव्या एमआयडीसीची जागा निश्‍चिती येत्या १५ जूनपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी (ता. ३१) दिली. (new MIDC place will be decided by June 15 jalgaon news)

जिल्हाधिकारी मित्तल व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे औद्योगिक व व्यापारी संघटनांच्या विविध मागण्यांबाबत आढावा बैठक घेण्याचेही या परिषदेत ठरले होते. त्यानुसार बुधवारी दुपारी श्री. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

परिषद संयोजक संगीता पाटील, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अनिल गावित, कार्यकारी अभियंता धीरज बारापात्रे, जळगांव क्षेत्र व्यवस्थापक वासुदेव सपकाळे, वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. एन. बोबडे, महावितरणचे सहाय्यक विद्युत निरीक्षक उल्हास नाईक, विमान प्राधिकरणाचे संचालक रोझी रवींद्रन,

मनपा अग्निशमन विभागाचे अधिकारी, ईएसआईसी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिल मेंबर नितीन इंगळे, दिलीप गांधी, महेंद्र रायसोनी, किरण बच्छाव व लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष प्रमोद संचेती, विनोद बियाणी, भारत पाटील, श्यामसुंदर अग्रवाल, सुयोग जैन, संदीप भोळे, सुयोग जैन, संजय जैन, अरविंद दहाड आदी सदस्य, तसेच उद्योजक, व्यापारी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या विषयांवर चर्चा

बैठकीत नवीन औद्योगिक वसाहत, ईएसआयसी हॉस्पिटल, वीज दर, दुहेरी कर आकारणी, फायर स्टेशन, लेबर सेस, माथाडी कामगार या संदर्भांतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. परिषदेच्या चेअरपर्सन सौ. पाटील यांनी नवीन औद्योगिक वसाहतीचा मुद्दा मांडला असता, कुसुंबा शिवारात भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू असून, नवीन एमआयडीसी जागेची निश्‍चिती १५ जूनपर्यंत होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच ईएसआयसी हॉस्पिटलबाबत शासनाकडून जागा उपलब्ध करून देण्याबाबत संमती दिलेली असून, १५ जूनपर्यंत जागेची पाहणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भडगाव येथेही करणार पाहणी

भडगाव औद्योगिक वसाहतीत एक्सप्रेस फिडरप्रमाणे वीजदर आकारणी केली जाते. परंतु एक्सप्रेस फिडरमधून वीज दिली जात नाही. असा मुद्दा उपस्थित केला असता, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला भडगाव औद्योगिक वसाहतीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या.

माथाडी कामगारांचा कायदा लागू न करण्याबाबत येत्या ८ जूनला बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले. तसेच जळगाव शहरातील रस्ते, फ्लायओव्हर संदर्भातील सर्व कामे दोन महिन्यांत पूर्ण होतील, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. दरम्यान, नवं उद्योजकांसाठी येत्या ८ जूनला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत बैठक होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT