Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

No hawkers zone : नो-हॉकर्स झोन आजपासून कार्यान्वित; विक्रेत्यांना गाड्या न लावण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

No hawkers zone : शहरातील रस्त्यावरील वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी महासभेत पाच रस्त्यांवर ‘नो हॉकर्स झोन’ ठराव मंजूर केला होता.

शुक्रवार (ता. १४)पासून त्याची अमंलबजावणी होणार आहे. महापालिका अतिक्रमण विभागाने गुरुवारी (ता. १३) या रस्त्यांवरील सर्व विक्रेत्यांना गाड्या न लावण्याच्या सक्त सूचना दिल्या. (No hawkers zone operational from today jalgaon news)

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी महासभेत केल्या होत्या. अतिकमण निर्मूलन विभाग कारवाई करीत नसल्याबाबत बहुतांश नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती.

अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्यामुळे शहरातील रेल्वेस्थानक परिसर, टॉवर चौक ते महाबळ, टॉवर चौक ते चित्रा चौक, चित्रा चौक ते न्यायलय चौक, न्यायालय चौक ते गणेश कॉलनी चौक या रस्त्यांवर ‘नो-हॉकर्स’ झोन करण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी दिला होता. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आजपासून अमंलबजावणी

महासभेत मंजूर केलेल्या ठरावाची अमंलबजावणी शुक्रवारपासून करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त गणेश चाटे यांनी दिली. ज्या प्रभागातील रस्ते ‘नो-हॉकर्स झोन’ ठरविले आहेत. त्या ठिकाणच्या प्रभाग अधिकाऱ्यांना, तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना श्री. चाटे यांनी दिल्या.

त्यानुसार गुरुवारी या रस्त्यांवरील विक्रेत्यांना शुक्रवारपासून रस्त्यांवर गाड्या न लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. गाड्या लावल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. विभागप्रमुख उमाकांत नष्टे, संजय ठाकूर, साजिद अली, सतीश ठाकरे, संजय पाटील, नाना कोळी आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT