shopkeepers demanding no thumb impression on e poss machines nashik marathi news esakal
जळगाव

Jalgaon News : थम्ब इम्प्रेशन नसल्यास सप्टेंबरचे वेतन नाही; महापालिका उपायुक्तांचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिकेतील काही कर्मचारी काम न करता वेतन घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही जण थम्ब इंम्प्रेशन मशीन बंद असल्याचा बहाणा करून मस्टरवर सह्या करून वेतन घेत आहेत. (No September pay to municipality worker if no thumb impression jalgaon news)

मात्र, त्यांच्या या प्रकारांना आता आळा बसणार आहे. महापालिका आता सप्टेबर महिन्याचे वेतन थंब इंम्प्रेशन मशिनच्या हजेरीनुसारच करणार असल्याची माहिती उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी दिली.

महापालिकेत सद्यस्थितीत तळमजल्यावर थम्ब इम्प्रेशन मशिन बसविण्यात आले आहे. परंतु, आता प्रत्येक मजल्यावर त्या-त्या विभागाबाहेर मशिन बसविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या विभागात जावूनच थम्ब करावा लागणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

थम्ब असल्याशिवाय सप्टेबरचे वेतन अदा केले जाणार नाही. तत्कालीन जळगाव नगरपालिकेत २ हजार ६३२ कर्मचारी कार्यरत होते. नगरपालिका असताना १९९१ ते १९९७ या कालावधीत भरती झालेले कर्मचारी आता निवृत्त होत असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.

सध्या माहापालिकेत १ हजार ४७० एवढेच कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. असे असतांनाही काही कर्मचारी फक्त सह्या करून निघून जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांतर्फे आता सक्तीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT