The road was closed due to vehicles being parked in front of the administrative building.  esakal
जळगाव

Jalgaon Traffic Problem : पाचोरा शहरात वाहनतळाअभावी कोंडी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘खो'

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Traffic Problem : येथील पालिका हद्दीतील प्रमुख रस्ते, चौक व व्यापारी संकुल परिसरात वाहनतळ नसल्याने भर रस्त्यात वाहने लावण्याचे प्रकार व प्रमाण वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत आहे.

पालिका व पोलिस प्रशासन मात्र या गंभीर प्रकाराकडे उघड्या डोळ्यांनी बघत असून, आम्ही त्या गावचेच नाहीत, अशा अविर्भावात वावरत आहेत. मात्र नागरिकांना त्याचा त्रास व मनस्ताप सोसावा लागत आहे.

शहरात लोकसंख्या तसेच विविध वसाहती, रस्ते यासह वाहनांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे मात्र आहे ते रस्ते मोकळे व्हायला तयार नाहीत. (number of vehicles on road is increasing problem of traffic congestion is becoming serious jalgaon news)

तसेच पालिकेच्या वतीने शहर सौंदर्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत विविधांगी योजनांची अंमलबजावणी केली जात असताना वाहनतळाचा विषय मात्र संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्षित होत आहे.

शहरात लहान-मोठी विविध व्यापारी संकुले उभारण्यात आली आहेत. नियमानुसार व्यापारी संकुल परिसरात पार्किंग झोन आहेत. परंतु या पार्किंग झोनच्या जागा व्यापारी व दुकानदारांनी हडप केल्या आहेत. पादचारी मार्गही स्वतःची मालमत्ता समजून बंद करण्यात आले आहेत.

एवढेच नव्हे तर व्यापारी संकुलातील शौचालये देखील काही दुकानदार व डॉक्टरांनी आपल्या मालकीची समजून ती कुलूप बंद केली आहेत. त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी, सवलती, सुविधा संपुष्टात आल्या आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी महाराज चौकालगत भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात आली असून मिनी मंत्रालय म्हणून तिचा लौकिक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या मिनी मंत्रालयाला पार्किंग झोन असला तरी कर्मचारी व या इमारतीत येणारे नागरिक बाहेर रस्त्यावर आपली वाहने लावतात. तहसीलदारांना आपले शासकीय वाहन देखील इमारतीपर्यंत नेता येत नाही.

तोच प्रकार पंचायत समिती कार्यालयात संदर्भात आहे. रेल्वेस्थानक या महत्त्वपूर्ण प्रमुख व वर्दळीच्या रस्त्यावर देखील वाहने लावली जातात. बसस्थानक रोड, पालिका इमारत, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्यासमोर असलेली वाहनांची गर्दी साऱ्यांचीच डोकेदुखी ठरली आहे. भडगाव रोड भागात कृउबा समिती संकुलासमोर, देशमुख वाडी भागात अर्ध्या रस्त्यापर्यंत वाहने लावण्यात येतात.

याच रस्त्यावरून सर्व विभागांचे अधिकारी ये जा करत. असतात परंतु एकही अधिकारी या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी धजावत नाही. प्रशासकीय इमारतीलगत ग्रामीण रुग्णालयासह विविध शासकीय कार्यालये आहेत. या रस्त्याच्या मधोमध वाहने लावली जातात. पायी चालणे देखील अशक्य होते.

शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक बँका आहेत. येथे मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. परंतु या बँकांनी कोणत्याही प्रकारे वाहनतळाची व्यवस्था न केल्याने भर रस्त्यात बँकेचे ग्राहक, कर्मचारी वाहने लावत असतात.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी नुकताच पाचोरा दौरा केला. याप्रसंगी झालेल्या बैठकांमध्ये प्रशासकीय इमारत परिसरातील वाहतूक कोंडीचा विषय मांडला असता श्री. मित्तल यांनी हा परिसर ‘नो पार्किंग झोन’ करण्याचे आदेशित केले, असे असताना संबंधित अधिकारी योग्य ती कार्यवाही करत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाच ‘खो’ दिला जात असल्याचे संतापजनक चित्र आहे.

"शहरातील व्यापारी संकुलात पार्किंगची नियोजित जागा आहे. परंतु त्या जागा गाळेधारकांनी बळकावल्या आहेत. अनेकदा अतिक्रमण काढले. वेळोवेळी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली जाते. परंतु पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती होते. पालिका प्रशासनाच्या वतीने या प्रकाराकडे लक्ष केंद्रित केले जाईल." - शोभा बाविस्कर पालिका प्रशासक, पाचोरा

"शहरातील प्रमुख रस्ते, चौक, व्यापारी संकुले येथे पार्किंगची जागा निश्चित नाही. पालिकेशी अनेकदा बोलणे झाले. परंतु प्रतिसाद मिळत नाही. अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी वाढते आहे. अतिक्रमण काढण्याचे काम पालिकेने करावे. त्यासाठी पोलिसांची मदत दिली जाईल. वाहतूक पोलिसांमार्फत आमची कारवाई सुरूच असते. ही कारवाई आणखी गतिमान व कठोर केली जाईल." - राहुल खताळ पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT