crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : घराचे कर्ज फेडण्यासाठी विवाहिता छळाबद्दल गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : घराचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पीडिताने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला.(Offense for harassing wife to pay house loan jalgaon crime news)

जळगाव शहरातील के. सी. पार्कमध्ये माहेर असलेल्या पल्लवी उमेश सपकाळे (वय १९) हिचा विवाह कोल्हे हिल्स परिसरातील उमेश सुरेश सपकाळे यांच्याशी झाला.

पती उमेश याने विवाहितेला घराचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपयांची मागणी केली. विवाहितेने पैशांची पूर्तता केली नसल्याने विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी त्रास देणे सुरू केले.

हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आली. शनिवारी (ता. २८) जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

विवाहितेच्या तक्रारीवरून पती, सासू वर्षा सुरेश सपकाळे, नणंद चैताली नन्नवरे, जेठाणी उज्जवला यशवंत सपकाळे, जेठ यशवंत सुरेश सपकाळे, नणंद साधना देवीदास साळुंखे, नंदोईभाऊ देवीदास मंगा साळुखे, किसन बाबूराव सपकाळे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक विरेंद्र शिंदे हे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT