electricity esakal
जळगाव

नवरात्रोत्सवात अधिकृत वीजजोडणी घ्या; MSEDCLचे दुर्गोत्‍सव मंडळांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी, तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

नवरात्रोत्सव सोमवार (ता. २६)पासून सुरू होत आहे. उत्सवाच्या कालावधीत संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी वीजव्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. मंडपातील वीजयंत्रणेची अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.(official electricity connection during Navratri festival MSEDCL appeal to Durgotsava Mandals Jalgaon news)

मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये वीजप्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत, असे आवाहनदेखील केले आहे. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८०० २१२ ३४३५ किंवा १८०० २३३ ३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

असे असतील वीजदर

महावितरणकडून नवरात्रोत्सव मंडळांना घरगुती वीजग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी केवळ चार रुपये ७१ पैसे प्रतियुनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी आठ रुपये ६९ पैसे प्रतियुनिट, ३०१ ते ५०० प्रतियुनिट वीजवापरासाठी ११ रुपये ७२ पैसे प्रतियुनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीजवापरासाठी १३ रुपये २१ पैसे प्रतियुनिट दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे. मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

Navi Mumbai : APMC मार्केटजवळ भीषण आग, १० पेक्षा जास्त ट्रक, टेम्पो जळून खाक

Bus-Car Accident : कोल्हापुरातून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; बस-कारच्या धडकेत चौघे ठार, एक जण जखमी

Panchang 7 July 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT