Officials and activists of Kisan Congress performing Shradh and shaving against the government's agricultural policies.
Officials and activists of Kisan Congress performing Shradh and shaving against the government's agricultural policies.  esakal
जळगाव

Jalgaon News : जिवंतपणी शेतकऱ्यांनी घातले स्वतःचे श्राद्ध; सरकारच्या कृषी धोरणांचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शिंदे-फडणवीस सरकारच्या चुकीच्या शेतकरी धोरणांचा निषेध करत शेतकऱ्यांचे जिवंतपणीच श्राद्ध घालून गंधमुक्ती व उतरकार्याचा कार्यक्रम येथील किसान काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (ता. ६) तहसील कार्यालयाच्या बाहेर करण्यात आला.

या वेळी किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे व आमदार अनिल भाईदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. (Officials of Kisan Congress performed Shraddha and shaving against government agricultural policies jalgaon news)

कापूस, कांदा व भुसार यांचा भाव हमीभावापेक्षा खाली आल्याने सरकारी खरेदी तत्काळ सुरू करण्यात यावी, कापूस आयात थांबवावी, पी.एम. किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानातील त्रुटी दुरुस्त करून अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, यासह अनेक शेतकरी हिताच्या बाबींसाठी किसान काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांचा सामूहिक मुंडन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन

या वेळी शासनाच्या नाकर्त्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी श्राद्ध घालून गंधमुक्ती व उतरकार्याचा कार्यक्रम महसूल कार्यालयाबाहेरच उरकला. आंदोलनावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सुभाष पाटील, चुणिलाल पाटील, सुनील पाटील, प्रताप पाटील यांनी मुंडन करून शासनाच्या धोरणांचा निषेध केला. किसान काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे व पथकाने चोख बंदोबस्त ठेवला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी किसान काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष उत्तम देसले, जिल्हाध्यक्ष तथा अमळनेर बाजार समिती उपसभापती सुरेश पाटील, किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व बाजार समिती संचालक प्रा. सुभाष पाटील, खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, समाधान धनगर, नितीन पाटील, भोजमल पाटील, बी. के. सूर्यवंशी, संदीप पाटील, प्रा. सुरेश पाटील, राजू फाफोरेकर, प्रा. श्‍याम पवार, मुन्ना शर्मा, संभाजी पाटील,

गिरीश पाटील, रवींद्र पाटील, बन्सीलाल भागवत, श्रावण तेले, एल. टी. पाटील, कैलास पाटील, श्रीकांत पाटील, धनगर दला पाटील, सचिन पाटील, अनंत निकम, दबीर पठाण, हर्षल जाधव आदी उपस्थित होते. या वेळी परदेशातून कापूस आयात करणाऱ्या शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, आमदार अनिल पाटील, प्रा. सुभाष पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT