Beating esakal
जळगाव

चारा उचलण्याच्या कारणावरून चाळीसगावात ज्येष्ठाला मारहाण

याप्रकरणी शहर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : गुरांसाठी ठेवलेला चारा उचलण्यास सांगितल्याच्या कारणावरून एकाने ६० वर्षीय ज्येष्ठाला लाकडी काठीने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. ७) दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी राजेंद्र सखाराम जाधव (वय ६०) हे शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. मंगळवारी (ता. ७) दुपारी दीडच्या सुमारास राजेंद्र जाधव हे गुरांसाठी मोकळ्या जागेवर ठेवलेला चारा घेण्यासाठी गेले व चारा घेऊन परत येताना संदीप राजू सोनवणे याने ‘आईला चारा उचलण्याबाबत का सांगितला’ असे म्हणत जाधव यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडा जाधव यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव होऊ लागला. अशातच राजू दामू सोनवणे, संगीता राजू सोनवणे (रा. शिवाजीनगर, चाळीसगाव) व बबलू नाना सोनावणे (रा. विजयसिंग राजपूत नगर), गोलू छोटू सोनावणे (रा. घाटरोड, चाळीसगाव) हे घरातून पळत बाहेर आले व त्यांनीही जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जाधव यांच्या कुटुंबीयांनी मध्यस्थी करत त्यांच्या तावडीतून जाधव यांची सुटका केली. जखमी जाधव यांना तातडीने खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. राजेंद्र जाधव यांच्या या फिर्यादीवरून शहर पोलिसात वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT