tired old man esakal
जळगाव

Jalgaon : आजाराला कंटाळून वृद्धाने कापून घेतल्या हातच्या नसा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ सोमवारी (ता. २२) एका वृद्धाने सुसाईड नोट लिहीत हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. शहर पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अत्यवस्थ वृद्धाला जिल्‍हा रुग्णालयात हलवण्यात आले. (An old man cuts veins of his hand due to illness Jalgaon Latest marathi news)

शहरातील महाबळ रोडवरील सानेगुरुजी कॉलनी परिसरात सुरेश पांडे (वय ७२) वास्तव्यास आहे. पांडे सोमवारी दुपारच्या सुमारास शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील एका बाकावर एकांतात बसलेले होते. त्यांनी त्याच वेळेस सुसाईट नोट लिहीत स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करुन हाताच्या नसा कापून घेतल्या.

रक्ताच्या धारा सुरू होऊन घडला प्रकार उद्यानातील काही सुज्ञ नागरिकांना आढळून आला. त्यांनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. पोलिस नाईक संजय बडगुजर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सुरेश पांडे यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती बरी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

उपचारानंतर मुलाच्या स्वाधीन

घटनेनंतर पोलिसांनी पांडे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांचा मुलगा रुग्णालयात पोचला, माझे वडील मनोरुग्ण असून त्यातून त्यांनी हा प्रकार केला असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले.

अशी सुसाईड नोट

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी सुरेश पांडे यांनी सुसाईट नोटमध्ये, ‘मा. एस. पी. साहेब मी सुरेश पांडे स्वत: आत्महत्या करीत आहे. यात कोणी दोषी नाही, मला ९० टक्के दिसत नाही; आजाराला कंटाळला आहे. मी स्वत: जबाबदार आहे धन्यवाद.’ असे नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT