Omicron Growing Danger In Jalgaon Crowded Restrictions sakal
जळगाव

जळगाव : ओमिक्रॉनचा वाढता धोका; जळगावात गर्दीला प्रतिबंध

मॉल, दुकाने, मंगल कार्यालयासाठी ५० टक्के क्षमता : मनपातर्फे चार पथके

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ओमिक्रॉनचा (Omicron) वाढता धोका लक्षात घेत जळगाव (Jalgaon) शहरातील गर्दीला प्रतिबंध करण्यात येणार आहे, यासाठी मॉल, दुकाने, मंगल कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची क्षमता ठरवून देण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन करण्याऱ्याविरूध्द कारवाईसाठी जळगाव महापालिकेतर्फे चार पथके तैनात करण्यात आली आहेत.

जळगाव महापालिकेच्या उपायुक्तातर्फे आदेश जारी करण्यात आले आहेत, यात त्यांनी म्हटले आहे, की जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ तसेच साथरोग, कोरोना प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये शहरातील व्यवसायासाठी काही नियम व अटीच्या अधीन राहून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे, शासन नियमाचे पालन करण्यासंदर्भात अटी व नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमानुसार शहरातील मॉल, आस्थापना, सिनेमागृह, लग्न समारंभ,दुकाने यांना ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता १८६०(४५) चे कलम १८८,आपत्ती कलम ५१ते ६० व फौजदारी संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार दंडास प्राप्त असतील.

महापालिकेची चार पथके तैनात

जळगाव महापालिकेतर्फे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. एका पथकात तब्बल आठ कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहेत. हे पथके शहरात फिरून कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई तसेच दुकाने सील करण्याची कारवाईसुध्द करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

Buldhana News: उत्साहाला गालबोट! नदीकाठी आंदोलन पेटलं, स्वातंत्र्यदिनी आंदोलकाला जलसमाधी; जळगावमध्ये नेमकं काय घडलं?

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

SCROLL FOR NEXT