death news  esakal
जळगाव

दही हंडीच्या दिवशीच दोघांनी घेतला जगाचा निरेाप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील सर्वोत्तमनगरात कलाभवन समोरील रहिवासी ३८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात दुपारी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. तर, दुसऱ्या एका घटनेत हनुमाननगरातील ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेत जिवन यात्रा संपवली. संपूर्ण शहर दहीहंडीचा सण साजरा करत असताना शुक्रवारी (ता. १९) दुपारच्या सुमारास दोन्ही घटना घडल्या असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

कल्लूसिग प्रजापती कुशावह (वय ३८, रा. कलाभवन समोर, सर्वोत्तमनगर) हे मोठे भाऊ आणि वहिनीसोबत वास्तव्याला होते. पाणीपुरीची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी (ता. १९) दुपारी ४ वाजता कल्लूसिंग यांचा भाऊ हा पाणीपुरीची गाडी घेवून विक्रीसाठी निघून गेला. त्यावेळी कल्लूसिंग घरात एकटेच होते. राहत्या घरात त्यांनी दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

दुसरीकडे हनुमाननगरातील घटनेत दत्तात्रय दगडू चौधरी (वय ३१, रा. हनुमाननगर) यांनी घरासमोर सुरु असलेल्या निर्माणाधीन इमारतीत जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास काही मजूर जेवण करून साइटवर परतले असता, त्यावेळी त्यांना दत्तात्रय गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी लागलीच ही घटना त्याच्या कुटुंबीयांना सांगितली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दत्तात्रय यांना खाली उतरवीत जिल्हा रूग्णालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषित केले. दोन्ही घटनांचा तपास सहाय्यक फौजदार सचिन मुंडे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

तो आला आणि माझं आयुष्यच बदललं! रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची कबुली; शेअर केला तिच्या रोमिओचा फोटो

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

SCROLL FOR NEXT