On occasion of Kartik Ekadashi tomorrow Rathotsav by Shri Ram Mandir in jalgaon news 
जळगाव

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिक एकादशीनिमित्त उद्या श्रीराम मंदिरातर्फे रथोत्सव

सकाळ वृत्तसेवा

Kartiki Ekadashi 2023 : जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त श्रीराम वहनोत्सव १४ नोव्हेंबरपासून सुरू आहे. मंदिरातर्फे गुरूवारी (ता.२३) कार्तिक एकादशीनिमित्त श्रीराम रथोत्सव होईल.

रामरायांची चैतन्यमय मूर्ती पालखीत विराजमान करून रामनामाच्या जयघोषात आणि सनईच्या मंगल स्वरात श्रीराम मंदिराचे महाद्वारात येईल. ( On occasion of Kartik Ekadashi tomorrow Rathotsav by Shri Ram Mandir in jalgaon news )

इथे श्री अप्पा महाराजांच्या वंशज सौ. सूनबाईंचे हस्ते रामरायांना औक्षण करून दीप ओवाळून रामराया पुनश्च गर्भगृहात सिंहासनावर विराजमान होतील. रथोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. २१) सकाळी रथ पाण्याने धुण्यात आला.

रंगरंगोटी करून आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. बुधवारी (ता.२२) आंब्याचे पाण्याचे तोरण, फुलांनी सजवण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. २३) कार्तिक एकादशीनिमित्त श्रीरामाचा रथोत्सव निघेल. सकाळी नऊला श्रीराम मंदिरात रथाचे पूजन होईल.

यावेळी आमदार राजुमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह रथोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, भाविक उपस्थित राहतील. मंदिराचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्या हस्ते श्रीरामाची मूर्ती रथात विराजमान केली जाईल.

उपस्थित सर्व रामभक्तांना प्रसाद व श्रीफळ संस्थांकडून विद्यमान गादीपती मंगेश महाराज यांचे शुभहस्ते दिला जाईल. महाआरतीनंतर रथोत्सव सुरू होईल.

रथोत्सवाचा मार्ग

श्रीराम मंदिरापासून भोईटे गढी, कोल्हेवाडा, डॉ. आंबेडकरनगर, चौधरीवाडा, तेली चौक, राम मारुती पेठ, मंदिराच्या मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, सुभाष चौक, दाणा बाजार, शिवाजी रोड, घाणेकर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौकमार्गे सराफ बाजारातील श्री भवानी मंदिर, श्री मरीमाता मंदिर, भिलपुरामार्गे भिलपुरा चौक, दधिची चौक, बालाजी मंदिरामार्गे रात्री बाराला रथ चौकात परत येईल.

तयारी रथोत्सवाची..!

दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिर संस्थानचा श्रीराम रथोत्सव कार्तिकी एकादशीला. गुरुवारी साजरा होतोय.. त्यासाठी मंगळवारी रथ घराबाहेर काढून त्याची स्वच्छता करण्यात आली.. महापालिकेच्या अग्नीशमन बंबाच्या सहाय्याने रथ धुताना कर्मचारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT