Sucide Case esakal
जळगाव

Jalgaon News : धमकी दिल्याने एकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तुझे लग्न जमू देणार नाही, अशी धमकी दिल्याने एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (ता. २१) दुपारी दोनच्या सुमारास सुनंदा धनराज पाटील घरासमोरून जात असताना प्रकाश पाटील यांची मावशी व सुनंदाबाई पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. पुन्हा सायंकाळी पाचला धनराज रघुनाथ पाटील घरासमोर येऊन शिवीगाळ करीत होते.

धनराजने मावशी व आजोबांना मारहाण केली. भांडण सोडवायला गेलेला मामा विजय साहेबराव पाटील यालाही मारहाण करून तुझे लग्नच जमू देणार नाही आणि लग्न कसे जमते तेच बघतो, अशी धमकी दिली. यापूर्वीही त्याने विजय पाटील यांना धमकी दिली होती. (One committed suicide due to threats Jalgaon News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

याचे वाईट वाटून विजय साहेबराव पाटील याने शुक्रवारी (ता. २३) सकाळी बारापूर्वी सातरणे रस्त्याला शालीक पाटील यांच्या शेताच्या बांधावर चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत रणाईचे येथील प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनराज रघुनाथ पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक नरसिंग वाघ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT