crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : यावलला क्षुल्लक कारणावरून एकाचा खून; दुसरा गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : चहाच्या टपरीवर सुरू असलेल्या चेष्टा मस्करीतून परस्परविरोधी झालेल्या भांडणातून एकावर चाकूहल्ला केल्याने उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर लोखंडी सळईने मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

यात परस्परांकडून फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. (one person killed in yawal in small dispute jalgaon crime news)

या संदर्भातील माहिती अशी, की शहरातील बोरावल गेट परिसरात शुक्रवारी (ता. ६) सायंकाळच्या सुमारास धनगरवाडा येथील राहणारे प्रभाकर आनंदा धनगर (वय ५५) व रामा केशव ढाके (रा. व्यासनगर, यावल) यांच्यात थट्टा-मस्करी सुरू असताना त्याचे रुपांतर भांडणात होऊन रामा केशव ढाके याने हातातील चाकूने प्रभाकर धनगर यांच्यावर हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले.

तातडीने धनगर यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. प्राथमिक उपचारानंतर जळगाव येथे मध्यरात्रीनंतर उपचारादरम्यान धनगर यांचा मृत्यू झाला. याबाबत प्रभाकर धनगर यांचे भाऊ अशोक आनंदा धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रामा ढाके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परस्परविरोधी गुन्हे दाखल

दरम्यान, याच प्रकरणी आशा रामा ढाके (वय ५०, रा. देशमुखवाडा, यावल) यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीत म्हटले आहे, की शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान फिर्यादीचे पती रामा केशव ढाके हे बोरावल गेट परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे असताना संशयित आरोपी प्रभाकर आनंदा धनगर याने रामा ढाके यांना अश्लील शिविगाळ करीत लोखंडी सळईने फिर्यादीचे पती यांना डोक्यावर, हातापायावर मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे.

पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुजफ्फर खान या दोन्ही घटनांचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणी परिसरातील धबधबा पुन्हा प्रवाहित

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

SCROLL FOR NEXT